(Wealth) फॅशनिस्टा करीना कपूरचं (Kareena Kapoor Khan) नाव बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री म्हणून घेतलं जातं. करीनाचा फॅश सेन्स असो किंवा तिने बॉलिवूडमध्ये आणलेलं झिरो फिगरचं फॅड. अनेक तरुणी तिला आजही फॉलो करतात. करीना आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. पण तिच्या फॅशनचा जलवा कुठेही कमी झालेला नाही तसंच गर्भवती असतानाही ती काम करत आहे, सोशल मीडियावरही सक्रीय आहे. करीना कपूरची लाइफस्टाइलही तेवढीच भन्नाट आहे.

2004 मध्ये तिच्याकडे 74.47 कोटींची संपत्ती असल्याची नोंद झाली होती. फोर्ब्जच्या सर्वात पॉवरफूल सेलिब्रिटींच्या यादीत तिने सातवा नंबर पटकवला होता. (Wealthआता तिच्याकडे 413 कोटींची संपत्ती असल्याची नोंद झाली आहे. करीनाला वेगवेगळ्या प्रकारच्या हँडबॅग्ज खरेदी करायची खूप आवड आहे. तिच्याकडे बॅग्जचं मोठं कलेक्शन आहे. तिच्याकडे BMW, टोयॉटा, लँड क्रूझर अशा एकापेक्षा एक भन्नाट कार आहेत. त्यातील BMW ही कार सैफ अली खानने तिला गिफ्ट केली होती.

करीना तिच्या कुटुंबासोबत वांद्र्याच्या फॉर्चून अपार्टमेंटमध्ये राहते. तिचं घरं अतिशय अलिशान आहे. तिच्या घरात सध्या ती बाळाच्या आगमनाची तयारी करत आहे. करीना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. खासकरुन इन्स्टाग्रामवरुन तिच्या आयुष्यातले सगळे अपडेट्स ती चाहत्यांपर्यंत पोहचवते.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, करीना लवकरच लाल सिंह चड्ढा सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. लाल सिंह चड्ढा सिनेमातला आमिर खानचा लूक खूपच व्हायरल झाला होता. थ्री इडियट्सनंतर करीना आणि आमिरला एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.