crime news- अनैतिक संबंधाच्या (immoral relations) संशयावरून चार मित्रांनी धारदार शस्त्रांनी एका मित्राचा
खून केला. मृताचे दोन्ही हात, पाय व मुंडके धडापासून तोडण्यात आले होते. ही घटना गणेशवाडी येथे घडली.

संजय महादेव गोरवे (वय २३ रा. टाकळी, टेंभुर्णी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दादा कांबळे (रा. बावडा), लकी विजय भोसले, विकी उर्फ व्यंकटेश विजय भोसले आणि महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे अशी आरोपींची नावे आहेत. यातील विकी भोसले व महेश सोनवणे या दोघांना इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे. immoral relations या प्रकरणी मृत तरुणाची आई मंजूषा गोरवे (५१, रा. टाकळी, टेंभुर्णी) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-------------------------------------

Must Read

💪1) धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा

😱 2) पेट्रोल 92 च्या पार, डिझेलचेही दर वाढले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

 🏢 3) बेकायदेशीर बांधकाम प्रकरण, उच्च न्यायालयाचा सोनू सूदला दणका

------------------------------------

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय, लकी, विकी व महेश एकमेकांचे मित्र असल्याने त्यांचे घरी जाणे-येणे होते. यातूनच लकी, विकी व महेश यांच्या नातेवाइक असलेल्या सुश्मिता, सखुबाई व कोमल यांच्याशी संजयची ओळख झाली होती. बावडा येथील दादा कांबळे यांच्या घरी एका कार्यक्रमानिमित्त संजयला त्यांनी बोलावून घेतल्याची कल्पना फिर्यादीला होती. त्या दिवसापासून फिर्यादी यांचा मुलगा संजय घरी परत न आल्याने फिर्यादींनी संजय बेपत्ता असल्याची तक्रार टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दिली होती.

भीमा नदीपात्राच्या पाण्यात एक प्रेत तरंगत असल्याचे एकाने सांगितले. सदर मृतदेह संजय याचाच असल्याची खात्री पटल्याने त्यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास इंदापूरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.