pollardsports news- मुंबई इंडियन्सचा (mumbai indians) व वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्डचा (cricketer) अपघातात मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युट्यूब व्हिडीओमुळे (video viral) कायरन पोलार्डचा (pollard) अपघातात मृत्यू झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली असता असं काहीही नसल्याचं समोर आलं आहे.

युट्यूबवर व्हायरल (video viral) होणाऱ्या व्हिडीओनंतर सत्यता पडताळून पाहिली असता ही बातमी पूर्णत: खोटी आहे. पोलार्ड सध्या अबुधाबी येथे सुरू असलेल्या टी१० लीगमध्ये खेळत आहे. व्हिडीओ व्हायरल झाला त्यावेळी पोलार्ड मैदानावर सामना खेळत होता. ---------------------------------

Must Read

1) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

2) “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”

3) Bigg Boss14 :- राखी सावंतचा बचाव करणं सलमानला पडलं भारी

---------------------------------पोलार्ड (pollard) या लीगमध्ये डेक्कन ग्लेडिएटर्स संघाचे नेतृत्व करत आहे. काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काही वर्षांपूर्वी सुरेश रैना (cricketer) याच्या अपघाताचाही खोटा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर रैनाने स्वतः पुढे येत ही बातमी खोटी असल्याचे स्पष्टीकरण दिलं होतं.

सोशल मीडियावर कधी काही व्हायरल (video viral) होईल याचा नेम नाही. एखादी घटना खरी असो अथवा खोटी, लोक बंद डोळ्यांनी विश्वास ठेवतात.