केतकी माटेगावकर


गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. एरव्ही सिंपल लूकमध्ये पाहायला मिळणाऱ्या केतकीने तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर (instagram post) करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोशूटमध्ये केतकीला ओळखणंही कठीण झालं आहे.



------------------------------------

Must Read

💪1) धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा

😱 2) पेट्रोल 92 च्या पार, डिझेलचेही दर वाढले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

 🏢 3) बेकायदेशीर बांधकाम प्रकरण, उच्च न्यायालयाचा सोनू सूदला दणका

------------------------------------

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. केतकीच्या चाहत्यांना तिचा हा ही अंदाज भावला आहे. तिच्या सोशल मीडियावर (instagram post)  नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील.


केतकीने तिच्या लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग केले असल्याचे पाहायला मिळतंय. करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर (photoshoot) नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल. टाईमपास', 'काकस्पर्श', 'तानी' या सिनेमात केतकी माटेगावकर झळकली आहे. अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिकादेखील आहे. सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय.