kalamba-prison-administration-emphasizes-security-

(Prison) कळंबा मध्यवर्ती कारागृहात (Kalamba Central Jail15 दिवसात एक दोन नव्हे तर 13 मोबाईल सापडले. कारागृहात हे मोबाईल पोहचले कसे?, त्याचा कसा वापर केला जाणार होता, हे शोधण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे. दरम्यान, सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून सीसीटीव्हीची संख्या वाढविण्याचा हलचालीसह पाहऱ्यासाठी श्‍वानाचीही मदत घेतली जात आहे. 

कळंबा कारागृहात आठ ते दहा दिवसांपूर्वी मोटारीतून आलेल्या दोघा अज्ञातांनी कपड्याचे तीन पुडके कारागृहात फेकले. त्यात 10 मोबाईल, गांजा, पेन ड्राईव्ह, चार्जर कॉडसह व्हीसील सापडल्याने कारागृहाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. यानंतर अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या पद्‌भार चंद्रमणी इंदूरकर यांच्याकडे सोपविला. त्यांनी तातडीने कारागृहाची तपासणी केली. त्यात एक मोबाईल संचसह चार बॅटऱ्या मिळून आल्या. यानंतर पुन्हा इंदरकर यांनी घेतलेल्या झडतीत झाड्याच्या बुंध्यात(Prison) बिस्किटाच्या मोकळ्या पाकिटात एक मोबाईलसह तीन बॅटऱ्या मिळून आल्या. कारागृहाला लागलेला या "मोबाईलचा व्हायरस' नष्ट करून त्यामागे कोणाचा "चार्जर' आहे? हे शोधण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. दरम्यान इचलकरंजी पोलिसांना याबाबतचे धागेदोरे हाती लागले आहेत. 

--------------------------------------

Must Read

1) एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

2) आमदाराच्या मुलीच्या लग्नात कलेक्टरांचं मारलं पाकीट

3) बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, दहावीची ३ मेनंतर : शिक्षणमंत्री

4) धक्कादायक! पोलीसच करत आहेत गुंडागर्दी, VIDEO

5) सोन्याची तस्करी चक्क अंडरवेअरमधून

6) अबब... ! करीना कपूर आहे इतक्या कोटींची मालकीण

--------------------------------------

68 सीसीटीव्हींचे सुरक्षा कवच 

कारागृहाच्या बाहेरील व आतील भागात 32 व 36 अशा एकूण 68 सीसीटीव्ही बसविण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार आहे. हा प्रस्ताव सुमारे 50 लाखांचा आहे. तो जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी सांगितले.