NEET


केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी 31 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता CBSE बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. CBSE बोर्ड 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा 4 मे ते 10 जून या कालावधीत होणार आहेत तर त्यांचे निकाल 1 जुलैपर्यंत लागणार आहेत. बोर्ड परीक्षेतील दिरंगाईचा परिणाम वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतल्या जाणार्‍या NEET परीक्षेवर होण्याची शक्यता आहे.

मेडिकल कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET परीक्षा मे महिन्यात घेण्यात येतात. नीट वेळेवर आयोजित करण्यासाठी येत्या काळात शिक्षण मंत्रालय काय व्यवस्था करेल हे पाहावं लागणार आहे. यंदा कोरोनामुळे सर्वच बोर्डाच्या परीक्षा उशिरा होत असल्यानं या देखील परीक्षा उशिरा होणार का? परीक्षा ऑफलाइन होणार की ऑनलाइन याबाबत देखील अनेक प्रश्न आहेत.

----------------------------------------

Must Read

1) आज कोरोना लसीसंदर्भात होणार मोठा निर्णय?

2) Amazon-Flipkart वर कारवाई करणार ED आणि RBI, मोदी सरकारचे निर्देश

3) महत्वाची बातमी : परदेशातील उच्च शिक्षणासाठी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

5) 2021 हे आरोग्यप्रश्न सोडवण्याचे वर्ष

--------------------------------------

10 डिसेंबर शिक्षणमंत्र्यांनी याबाबत उत्तर देताना म्हटलं होतं की NEET ही परीक्षा आतपर्यंत ऑफलाइन घेण्यात आली आहे. ही परीक्षा कशी होणार हे विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरून ठरवण्यात येईल. त्यामुळे किती विद्यार्थी नीट परीक्षा देणार यावर अनेक गोष्टींचं नियोजन अवलंबून असेल असंही यावेळी ते म्हणाले होते.

JEE मेन्स परीक्षा वर्षातून 4 वेळा होणार

अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी JEE मेन्सची परीक्षा 2021 पासून वर्षामध्ये चार वेळा घेण्यात य़ेणार आहे. ही परीक्षा 23 ते 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत पहिल्या टप्प्यात होणार आहे. त्यानंतर मार्च, एप्रिल, मेमध्ये तीन टप्प्यात पुढील परीक्षा होणार आहेत. एप्रिल महिन्यात 27, 28, 29 आणि 30 तर मे महिन्यात 24, 25, 26, 27, 28 तारखांना परीक्षा होणार आहे. 

JEE मेन परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nic.in वर भेट द्यावी. येथे देण्यात आलेल्या 'JEE मेन एप्रिल 2021 साठी अर्ज करा' वर क्लिक करा. त्यानंतर लॉगइन करावं आणि नोंदवी करावी. पुढे अर्ज करण्यासाठी फ्रेश यूजरवर क्लिक करा. फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व आवश्यक माहिती भरा. यावेळी फोटो स्कॅन करुन अपलोड करावा लागेल. अर्ज फी देखील भरावी लागेल. यानंतर नोंदणी क्रमांक सुरक्षित ठेवा.