cm uddhav thackerayभंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात (hospital) झालेल्या दुर्दैवी घटनेची (fire) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी (cm uddhav thackeray) सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. माहिती घेण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता शिशु केअर युनिटमध्ये शनिवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग (fire)लागली. या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर सात बालकांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेत आरोग्य राजेश टोपे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

---------------------------------

Must Read

1) जिओची डीलरशिप हवीय? आमिषाला बळी पडू नका; १ कोटी १० लाखांची फसवणूक

2) कोरोना लसीकरणाची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

3) राजर्षी छत्रपती शाहू समाधीकरिता आठ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

---------------------------------

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात (hospital) शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील चर्चा केली असून, त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

राहुल गांधींनी व्यक्त केली हळहळ


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भंडारातील या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली. त्याचबरोबर राज्य सरकारने जखमी व मृतांच्या कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत करण्याचं आवाहनही केलं आहे. “महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना वेदनादायी आहे. जीव गमावलेल्या मुलांच्या कुटुंबांबद्दल माझ्या सहवेदना व्यक्त करतो. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने सर्वोतोपरी मदत करावी, असं आवाहन मी करतो,” असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

रात्री दोन वाजताच्या सुमारास भंडारा जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किट झालं. त्यामुळे याठिकाणी आगीचा भडका उडाला. वेळीच मदतकार्य सुरू केल्यानं सात नवजात बालकांना नवं आयुष्य मिळालं. तर दहा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.