ipl-2021-chennai-super-kings-to-release-7-8-big-players

(IPL Live Score) आयपीएल 2021 (IPL 2021) च्या लिलावाआधी एमएस धोनी (MS Dhoni) ची चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) टीममध्ये मोठे बदल करणार आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नईची कामगिरी निराशाजनक झाली. इतिहासात पहिल्यांदाच त्यांना प्ले-ऑफ गाठता आलं नाही. पॉईंट्स टेबलमध्ये धोनीची टीम सातव्या क्रमांकावर राहिली. आता या मोसमात चेन्नई 7-8 खेळाडूंना डच्चू द्यायच्या तयारीत आहे.

चेन्नईकडे फक्त 15 लाख रुपये

चेन्नईच्या टीमकडे सध्या फक्त 15 लाख रुपये आहेत. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने आधीच यंदा मोठा लिलाव होणार नाही, हे स्पष्ट केलं आहे, त्यामुळे टीमना नवे खेळाडू घ्यायचे असतील, तर त्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रकमेतूनच घ्यावे लागतील. त्यामुळे चांगले खेळाडू घेण्यासाठी टीमला सध्याचे खेळाडू सोडावे लागतील, ज्यामुळे त्यांच्याकडे उपलब्ध असलेली रक्कम वाढेल.

Must Read 

1) विद्यापीठातील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

2) राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

3) भारताने केलेल्या Air Strike मध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू

4) एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली

5) Marathi Joke : महापावसाळी आघाडी

इनसाईड स्पोर्ट्समध्ये आलेल्या वृत्तानुसार चेन्नई 35 वर्षांच्या केदार जाधवला बाहेर करणार आहे. केदार जाधवला चेन्नई 7.8 कोटी रुपये देते. त्याशिवाय हरभजन सिंग, इम्रान ताहिर, (IPL Live Score) जॉश हेजलवूड, मुरली विजय, पियुष चावला, कर्ण शर्मा आणि ड्वॅन ब्राव्हो यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. आयपीएल टीम 21 जानेवारीपर्यंत खेळाडूंना सोडू शकणार आहे. तसंच 4 फेब्रुवारीपर्यंत टीमसाठी ट्रेडिंग विन्डो म्हणजेच खेळाडूंची अदलाबदली करता येणार आहे.

चेन्नईच्या खेळाडूंची किंमत

केदार जाधव- 7.8 कोटी

इमरान ताहिर- 1 कोटी

पियुष चावला- 6.75 कोटी

हरभजन सिंग- 2 कोटी

मुरली विजय- 2 कोटी

ड्वॅन ब्राव्हो- 6.4 कोटी

जॉश हेजलवूड- 2 कोटी

कर्ण शर्मा- 5 कोटी

या खेळाडूंनी सोडून दिल्यानंतर चेन्नईकडे 33 कोटी रुपये शिल्लक राहतील, ज्यामुळे त्यांना नव्या दमाचे चांगले खेळाडू विकत घेता येतील. याशिवाय शेन वॉटसन निवृत्त झाल्यामुळे त्याचेही 4 कोटी रुपये चेन्नईला अधिकचे मिळतील. चेन्नईच्या टीमला सुरेश रैनाबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत रैनाच्या कामगिरीवर त्याचं चेन्नईच्या टीममधलं भवितव्य ठरेल. रैनाला चेन्नईची टीम 11 कोटी रुपये देतं. मागच्या आयपीएलमध्ये रैना स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच भारतात परतला होता, त्यामुळे वाद निर्माण झाला होता. रैना पुन्हा कधीच चेन्नईकडून खेळताना दिसणार नाही, अशा चर्चाही सुरू होत्या, पण चेन्नईच्या टीमने मात्र असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं.