केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांनी सर्व पीएफधारक कर्मचार्यांना (EPF Employees) नवीन वर्षाची भेट दिली आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार (Santosh Gangwar) यांनी ईपीएफवरील व्याज दर वाढविण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सध्या जमा ईपीएफवर (EPF) 8.5 टक्के दराने व्याज दिले जाईल. आतापर्यंत कर्मचार्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.15 टक्के व्याज मिळत होते.
केंद्रीय मंत्री गंगवार यांनी आज 31 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी सर्व ईपीएफ धारकांना (EPF Employees) नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की मार्च 2020 मध्ये ईपीएफवरील व्याज वाढवण्याचे वचन दिले होते. जे आता निर्धारित वेळेत पूर्ण होत आहे.
---------------------------------------
Must Read
1) आज कोरोना लसीसंदर्भात होणार मोठा निर्णय?
2) Amazon-Flipkart वर कारवाई करणार ED आणि RBI, मोदी सरकारचे निर्देश
3) महत्वाची बातमी : परदेशातील उच्च शिक्षणासाठी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
5) 2021 हे आरोग्यप्रश्न सोडवण्याचे वर्ष
--------------------------------------
अर्थ मंत्रालयाशी सल्लामसलत करून आम्ही या प्रस्तावासाठी मान्यता मिळवली आहे. ही वेगळी बाब आहे की या व्याजदराच्या अंमलबजावणीची तारीख 31 मार्च 2020 होती, जी 31 डिसेंबर 2020 करण्यात आली. आता आम्ही या निश्चित मुदतीत त्या निर्णयाचे पालन करण्यास सक्षम आहोत. 2019-20 या आर्थिक वर्षात भविष्य निर्वाह निधीवर 8.5 टक्के दराने व्याज देण्याची अधिसूचना जारी केली आहे. आजपासून सर्व सहा कोटी ग्राहकांना हा व्याज दर मिळू लागला आहे.