information-about-idols-found-daund-river-basin

दौंड शहरातील भीमा नदी (Bhima Riverपात्रात सापडलेली महादेवाच्या मुखाची भग्न मूर्ती ही जिरेगाव (ता. दौंड) येथील असल्याची माहिती पुढे आली आहे. १९ महिन्यांपूर्वी सदर मूर्ती नदी पात्रात विसर्जित करण्यात आली होती.

दौंड येथील भीमा नदी पात्रातील ब्रिटीशकालीन दगडी रेल्वे पुलाशेजारी नवीन रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. खोदकाम सुरू असताना २६ डिसेंबर रोजी एक अर्धनारीनटेश्वर महादेवाचे फक्त मुख असलेली मूर्ती सापडली होती. सिमेंट कॉंक्रिटच्या या मूर्तीच्या मुखाची उंची ५ फूट ७ इंच असून रूंदी २ फूट ९ इंच आहे. मूर्ती भग्न असली तरी नदी पात्रात सापडल्याने त्याची पूजा सुरू करण्यात आली. 

----------------------------------------

Must Read

1) BREAKING: UK च्या फ्लाइट्सबद्दल भारताचा मोठा निर्णय!

2) मोठी बातमी, संजय राऊत यांच्या पत्नीबद्दल ईडीने केला नवीन खुलासा

3) 'हा सरपंचपदाचा नसून लोकशाहीचा लिलाव', अण्णा हजारे संतापले

4) Whatsapp वर कुणी ब्लॉक केलंय? या साध्या ट्रिक्सनी काढा शोधून!

5) नवीन वर्षात ठाकरे सरकारचा कैद्यांना दिलासा

----------------------------------------

दरम्यान वृत्तपत्रे व समाजमाध्यमांमध्ये आलेल्या सचित्र बातम्यांनंतर सदर मूर्ती दौंड शहरापासून कुरकुंभ मार्गे १४ किलोमीटर अंतरावर असणार्या जिरेगाव येथील असल्याची माहिती पुढे आली. तेथील श्री दत्त मंदिराच्यावर सोळा वर्षांपूर्वी ही मूर्ती बसविण्यात आली होती. सदर मंदिराच्या शिखराचे काम करावयाचे असल्याने महादेवाच्या मुखाची ही मूर्ती काढून ठेवण्यात आली होती. परंतु अशी मूर्ती मंदिरात जमिनीवर ठेवणे योग्य नसल्याचा विचार करून १९ महिन्यांपूर्वी ही मूर्ती दौंड मधील नदीत विसर्जित केली होती, अशी माहिती जिरेगाव ग्रामपंचायतचे सदस्य सोनबा मचाले यांनी दिली.

सरपंच भरत खोमणे यांनी त्यास दुजोरा दिला आहे. नदी पात्रात ही भग्न मूर्ती सापडल्यापासून भाविक त्याची पूजा करीत असून काही उत्साही लोकांनी पाच लिटर दुधाने मूर्तीस दुग्धाभिषेक देखील केला आहे. मंदिराच्या शिखराचे काम करायचे असल्याने महादेवाची मूर्ती काढून ठेवली होती. परंतु ती भग्न झाल्याने विधीपूर्वक पूजा करून ट्रॅक्टर - ट्रेलर मधून आणत दौंड येथे ग्रामस्थांसह मी मूर्तीचे विसर्जन केले होते