indurikar-maharaj-tears-over-the-death-of-his-colleague-

(Kingआपल्या कीर्तनातून अवघ्या महाराष्ट्राला हसवत अंतमुर्ख करणारे लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज (indurikar maharaj) यांचा ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. इंदुरीकर महाराज यांच्यासोबत किर्तनात साथ देणाऱ्या एका तरुण सहकाऱ्याचे निधन झाले. त्याचे अंतिमदर्शन घेत असताना इंदुरीकर महाराजांना अश्रू अनावर झाले.

प्रसिद्ध कीर्तनकार  इंदोरीकर महाराज देशमुख राज्यभरात ठिकठिकाणी किर्तनाचे सोहळे घेत असतात. त्यांच्यासोबत व्यासपीठावर मृदंग वादन करणारे ठाणगाव येथील मृदंगाचार्य श्रीहरी रमेश शेळके यांचं वयाच्या 30 वर्षी निधन झाले. अल्पशा आजारामुळे त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. तरुण वयात श्रीहरी शेळके यांच्या निधनामुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.


श्रीहरी शेळके हे संपूर्ण तालुक्यात मृदंग वादनासाठी प्रसिद्ध होते. गेली 12 वर्ष ते इंदुरीकर महाराज यांच्यासोबत होते. इंदुरीकर महाराज महाराष्ट्रात जिथे कुठे किर्तनाचा सोहळा (King)  घेणार त्याठिकाणी श्रीहरी शेळके कायम त्यांच्या सोबत होते. आपल्या सोबत गेली 12 वर्ष सोबत असलेल्या शेळके यांच्या मृत्यूमुळे इंदुरीकर महाराज भावनाविवश झाले. संपूर्ण तालुक्यात वारकरी संप्रदायावर त्याच्या निधनामुळे शोककळा पसरली.

सोमवारी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी इंदुरीकर महाराज आले होते. श्रीहरी शेळके यांच्या पार्थिवावर पुष्पमाला ठेवत असताना इंदुरीकर महाराजांना अश्रू अनावर झाले. आपल्या सहकाऱ्याच्या खांद्यावर डोके ठेवून इंदुरीकर महाराजांनी अश्रूना वाट मोकळी करून दिली. त्यांचा हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

श्रीहरी शेळके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.संपूर्ण तालुक्यात वारकरी संप्रदायावर त्याच्या निधनामुळे शोककळा पसरली.