jaspriti bumrah injured


IND vs AUS : रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) यांच्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs Australia) आणखी एक धक्का बसला आहे. चौथ्या टेस्टमधून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ही बाहेर झाल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. बुमराहच्या पोटातल्या मांसपेशींना दुखापत (injured) झाली आहे, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट खेळू शकणार नाही, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी टेस्टमध्ये बुमराहला दुखापत झाली. स्कॅनिंगमध्ये बुमराहच्या मांसपेशीला दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं. इंग्लंडविरुद्धची चार टेस्ट मॅचची सीरिज बघता, टीमला कोणताही धोका पत्करायचा नाही.

सिडनी टेस्टमध्ये फिल्डिंग करताना बुमराहच्या पोटात दुखायला लागलं. तो ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळणार नाही. इंग्लंडविरुद्ध तो खेळेल, अशी अपेक्षा आहे, असं बीसीसीआय सूत्राने पीटीआयला सांगितलं. 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन टेस्टला सुरूवात होणार आहे. बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय टीम नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन यांना घेऊन मैदानात उतरेल.

-------------------------------------

Must Read

1) कचरा डेपोप्रश्‍नी इचलकरंजीत आंदोलन

2) एकच चर्चा, हवा फक्त कोल्हापूरचीच...!

3) "सीरम'ला पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

--------------------------------------

बुमराह बाहेर गेल्यामुळे टी नटराजन याला खेळण्याची संधी मिळेल, हे जवळपास स्पष्ट झालं आहे, कारण त्याच्याशिवाय दुसरा कोणताही फास्ट बॉलर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उपलब्ध नाही.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाला दुखापतीचं (injured) ग्रहण लागलं आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये हनुमा विहारी आणि रविंद्र जडेजाला दुखापत झाल्यामुळे ते दोघंही चौथी टेस्ट खेळू शकणार नाहीत. जडेजाच्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं. तर मोहम्मद शमीदेखील दुखापतीमुळे पहिल्या टेस्टनंतर बाहेर झाला. उमेश यादवही दुखापतीमुळे टेस्ट सीरिज अर्धवट सोडून भारतात परतला. तिसऱ्या टेस्टदरम्यान अश्विनच्या पाठीलाही दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

हनुमा विहारीच्या अनुपस्थितीमध्ये ऋद्धीमान साहा याला विकेट कीपर म्हणून तर ऋषभ पंतला बॅट्समन म्हणून खेळवलं जाऊ शकतं, तसंच मधल्या फळीत मयंक अगरवालला खेळण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्ये रविंद्र जडेजाच्याऐवजी शार्दुल ठाकूरलाही संधी मिळू शकते. तसंच अश्विन वेळेत फिट झाला नाही तर कुलदीप यादवला संधी मिळू शकते.