India national cricket teamब्रिस्बेनमधील गाबा मैदानवर भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिकविजय मिळवला. या विजयाचा जल्लोष गुगलही करत आहे. गुगलवर तुम्ही Indian Cricket Team किवां India national cricket team असं टाइप करुन सर्च करा. तुम्हाला व्हर्चुअल (virtual) आतिशबाजी दिसेल.

बॉर्डर-गावसकर मालिका भारतानं जिंकल्यानंतर गुगुलनं क्रीडा चाहत्यांना हे खास सरप्राइज दिलं आहे. ब्रिस्बेन येथील कसोटी सामना जिंकून भारतीय संघानं लागोपाठ तिसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर मालिकेवर वर्चस्व मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला असलेल्या गाबावर भारतीय संघानं तीन विकेटनं विजय मिळवला.

------------------------------------

Must Read

💪1) धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा

😱 2) पेट्रोल 92 च्या पार, डिझेलचेही दर वाढले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

 🏢 3) बेकायदेशीर बांधकाम प्रकरण, उच्च न्यायालयाचा सोनू सूदला दणका

------------------------------------
ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजाय प्रत्येक भारतीयानं साजरा (virtual) केला. कोणी सोशल मीडियावर तर कोणी फटाके वाजवून. अनेकांनी फेसबुक आणि ट्विटवर आपल्या भावानांना वाट मोकळी करुन दिली. बुधवारी गुगलनेही ट्विट करुन ‘India national cricket team’ सर्च करण्यास सांगून व्हर्चुअल आतिषबाजीची माहिती दिली.

गुगलवर तुम्ही ‘India national cricket team’ सर्च केल्यास तुम्हालाही या आतिषबाजीचा आनंद घेता येईल. मोबाईल किंवा डेस्कटॉपवर सर्च करुन पाहू शकता. अनेक क्रीडा प्रेमींनी यामुळे गुगलाचं आभारही मानले आहेत.