cricket test match


IND vs AUS - ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा कसोटी (cricket test) सामना जिंकत चार सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के एल राहुलला (cricketer) दुखापत झाली आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे के एल राहुल उर्वरित मालिकेला मुकणार आहे. शनिवारी नेट्समध्ये सराव करत असताना त्याला दुखापत झाली होती.

बीसीसीआयने निवेदन प्रसिद्ध करत के एल राहुलच्या दुखापतीसंबंधी माहिती दिली आहे. “शनिवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर सराव करत असताना के एल राहुलच्या मनगटाला दुखापत झाली आहे. यष्टीरक्षक आणि फलंदाज के एल राहुलला दुखापतीतून पूर्ण बरं होण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ लागणार असल्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नसेल,” अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

------------------------------

Must Read

1) रोहित पवार पहाटे 4 वाजता पोहोचले एपीएमसी मार्केटमध्ये

2) नवा कोरोना व्हायरस पसरतोय, ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा

3) Petrol Price : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेलचे दर?

4) WhatsApp Pay वर सायबर फ्रॉडपासून सावधान

------------------------------

के एल राहुल (cricketer) लवकरच भारतात परतणार असून बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपस्थित राहणार असल्याचंही बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. के एल राहुलची भारतीय संघातील अनुपस्थिती भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे. याआधीच मोहम्मद शमी आणि उमेश यादव दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघात इशांत शर्मालादेखील सहभागी होऊ शकला नाही.

सिडनीमध्ये ७ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी (cricket test)सामन्यामध्ये एकीकडे रोहित शर्माची उपस्थित भारतीय संघासाठी मोठी जमेची बाजू असताना के एल राहुलची दुखापत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील भारतीय संघाला मोठा धक्का असू शकतो. हनुमा विहारीने तीन डावांमध्ये फक्त ४५ धावा केल्या असल्याने के एल राहुल कमबॅक करत भारतीय संघाची फलंदाजी मजबूत करेल अशी आशा होती. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकत बरोबरी केली आहे.