ravindra jadeja


IND vs AUS: भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. स्टीव्ह स्मिथचे दमदार शतक आणि मार्नस लाबूशेन व पुकोव्हस्कीची अर्धशतके यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तीनशे धावांचा टप्पा (test cricket) गाठला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे डावावर वर्चस्व होते, पण दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी यजमानांना स्वस्तात रोखले. रविंद्र जाडेजाने सर्वाधिक चार बळी टिपले. कसोटी क्रिकेटमध्ये याआधी न घडलेली एक गोष्ट या सामन्यात घडली.

भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या कसोटीसाठी मैदानावर आला. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार, सामन्याचे पंच, तिसरे पंच व सामनाधिकारी असे सारे जण मैदानावर आले. त्यात एका महिलेचा समावेश असल्याचं दिसून आलं. या महिलेचं नाव क्लारि पोलोसॅक. क्लारी ही पुरुषांच्या कसोटी सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम पाहणारी पहिली महिला अधिकारी ठरली. या आधी तिने पुरूषांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सामनाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या पहिल्या महिला अधिकाऱ्याचा मान मिळवला होता.

-------------------------------------------

Must Read

1) अभिजित जामदार याला जामीन

2) कोल्हापुरात एका दिवसात 10 नवे कोरोनाबाधित

3) गडकरींनी दिली Fastag बद्दल महत्त्वाची माहिती

---------------------------------------------दरम्यान, तिसऱ्या कसोटीत (test cricket) पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे कमी खेळ झाला. त्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्की याने अर्धशतक ठोकलं. मार्नस लाबूशेननेदेखील त्याला साथ देत अर्धशतकी खेळी केली. हे दोघे बाद झाल्यावर स्टीव्ह स्मिथने एक बाजू लावून धऱली आणि अप्रतिम शतक ठोकलं. स्मिथच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तीनशेपार मजल मारली.