IND vs AUS test match


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील (Border - Gavaskar Trophy) तिसरी टेस्ट सिडनी क्रिकेट  (cricket news) ग्राऊंडवर (SCG) झाली. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या (Team India)  हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आर. अश्विन (R. Ashwin) यांनी सहाव्या विकेटसाठी 256 बॉलची नाबाद पार्टरनरशिप केली. या खेळीच्या दरम्यान हे दोघंही जखमी झाले, तरीही त्यांचा निर्धार ढळला नाही. त्यांनी  सिडनीचं मैदान राखलं.  ऑस्ट्रेलियाच्या  (Australia)तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला.

टीम इंडियाचं कमबॅक

सिडनी टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा (Australia) कॅप्टन टीम पेननं (Tim Paine) टॉस जिंकून  बॅटिंगचा निर्णय घेतला होता.ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 338 रन काढले. त्यानंतर टीम इंडिया पहिल्या इनिंगममध्ये 244 रनवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियानं दुसरी इनिंगमध्ये 6 आऊट 312 रन केले आणि टीम इंडियासमोर विजयासाठी 407 रनचं अवघड टार्गेट ठेवलं.

----------------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीच्या दौरावर दोन गवे

2) पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

3) मनसेचे बाळा नांदगावकर 'ठाकरे सरकार'वर संतापले

----------------------------------------------

या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना चांगल्या सुरुवातीचा फायदा भारताला झाला नाही. चौथ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियानं 2 आऊट 98 रन केले होते. त्यानंतर पाचव्या दिवशी पहिल्याच सत्रात कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) झटपट आऊट झाला.

पंत-पुजारानं रचला पाया!

अजिंक्य रहाणे आऊट झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) ऋषभ पंतसोबत (Rishabh Pant) जोडी जमली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 148 रनची पार्टरनरशिप केली. हा एक भारतीय रेकॉर्ड आहे. या पार्टरनरशिपनं पाचव्या दिवशी सिडनी टेस्ट वाचवण्याचा पाया रचला होता. पंत (97) आणि पुजारा (77) रन काढून आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजय डोळ्यासमोर दिसत होता.

विहारी-अश्विनची लढाई!

पुजारा आऊट झाल्यानंर हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या जोडीनं मॅच वाचवण्याचं आव्हान स्विकारलं. रविंद्र जडेजा जखमी असल्यानं या दोघांनंतर एकही प्रमुख बॅट्समन शिल्लक नव्हता.  विहारीनं स्नायूच्या (Hamstring) दुखापतीनंतरही किल्ला लढवला. त्याला नीट पळता येत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसत होत्या. तरीही तो खेळत होता. (cricket news)

विहारीची अश्विननं खंबीर साथ दिली. अश्विनही बॅटींग करताना जखमी झाला. ही जोडी फोडण्याचे ऑस्ट्रेलियन बॉलर्सचे प्रयत्न त्यानं यशस्वी होऊ दिले नाहीत. या दोन्ही खेळाडूंनी दाखवलेल्या धैर्याची सध्या जोरदार प्रशंसा होत आहे.