gram panchayat election 2021ग्रामपंचायत निवडणुका (gram panchayat election 2021) आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (bmc election 2022 )पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) बैठक बोलावण्यात आली आहे. परंतु, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांच्या हाताला दुखापत झाल्यामुळे ही बैठक थोडक्यात आटोक्यात घेण्यात आली आहे. या बैठकीत भाजपसोबत जाण्याची सध्या चर्चा नाही, पुढे परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असं मनसेचे नेते (election) नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पुढील वर्षी होणार आहे. पण सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.  पण राज ठाकरे यांना टेनिस खेळत असताना दुखापत झाली असल्यामुळे आज बैठक आटोपती घेण्यात आली.

--------------------------------------

Must Read

1) कचरा डेपोप्रश्‍नी इचलकरंजीत आंदोलन

2) एकच चर्चा, हवा फक्त कोल्हापूरचीच...!

3) "सीरम'ला पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

--------------------------------------

राज ठाकरे यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. त्यांना डॉक्टरांनी सव्वा महिना प्लास्टर ठेवण्यास सांगितले आहे. टेनिस खेळत असताना त्यांना दुखापत झाली आहे. आज 9 महिन्यानंतर पहिल्यांदा मनसेची कृष्णकुंज बाहेर बैठक झाली आहे. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या भागातील माहिती थोडक्यात घेतली.

आजच्या बैठकीत राज ठाकरे यांनी केवळ माहिती घेतली जबाबदारीचे वाटप केले नाही, अशी माहिती मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी दिली.

तर, 'सध्यातरी भाजपबरोबर जाण्याचा विषय चर्चेला आला नाही. पुढे परिस्थिती काय बदल होतो त्यानुसार गोष्टी ठरतील. परंतु, आम्ही सर्व निवडणुका जोमाने लढू आणि चांगल यश संपादन करू, असं मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी (election)  सांगितले.

'मनसे सर्व निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मनसेचे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आम्ही चांगले यश संपादन करू, असा विश्वासही नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज ठाकरे यांची सुरक्षा महाराष्ट्र शासनाने दोन दिवसांपूर्वी कमी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना मनसे सैनिकांच्या वतीने नवीन सुरक्षाकवच देण्यात आलेले आहे. यामध्ये आज 50 जणांचा समावेश होता. उत्तर मुंबई मनसेच्या वतीने आज हे सुरक्षा कवच उभारण्यात आले होते.