IGM hospital


ichalkaranji शहरातील आयजीएम रुग्णालयातील (hospital) सफाई कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन हॉस्पिटलच्या ठेकेदाराविरोधात तक्रार केली होती. यामध्ये मनसेची त्यांना भक्कम साथ मिळाली होती. आता राज्यमंत्री यड्रावकर यांनी कर्मचाऱ्यांची समस्येची दखल घेऊन 50 कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिलाय. 

इचलकरंजीत आयजीएम हॉस्पिटल (hospital) कोव्हिड-19 काळामध्ये सर्वसामान्य जनतेचा आधार बनले होते. याठिकाणी पाच हजार रुग्णांनी कोरोना सारख्या महामारीवर मात केली आहे. मार्चपासून कोरोना चा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत चालला होता. यावेळी रुग्णालयांमध्ये डॉक्टर, सिस्टर व सफाई कर्मचारी यांची कमतरता होती. यावेळी राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट बेसवर रुग्णालयामध्ये स्टाफ भरून घेतला होता. त्यानुसार इचलकरंजी शहरातील आयजीएम रुग्णालयात देखील सुमारे 72 सफाई कर्मचाऱ्यांची भरती करून घेण्यात आली होती.

जिल्हा परिषदेच्या एका मतदानाद्वारे ही भरती करून घेण्यात आली होती. कोरोनाच्या काळामध्ये यांनी जीवाची पर्वा न करता आयजीएम रुग्णालय स्वच्छ व सुंदर ठेवले. त्या काळात त्या कर्मचाऱ्यांना बावीस दिवसाचा पगार दिला जात होता व आठ दिवसांचा पगार कट केला जात होता. 

------------------------------------

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसच्या विळख्यात सापडणार जग

2) IndvsAus : रोहित शर्मासह या ४ खेळाडूंवर कारवाईची शक्यता

3) तुम्ही ही गिझर वापरताय तर सावधान!

4) धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने केले वार

-------------------------------------

शिवाय कर्मचाऱ्यांचा कोणताही विमा सुरक्षा कवच नव्हते. पुरुषांना प्रतिदिन तीनशे रुपये तर महिलांना अडीशे रुपये असा पगार देण्यात येत होता. ज्यादा ड्युटीचा पगार देखील ठेकेदार देत नव्हता. अशा सर्व तक्रारी घेऊन मनसेचं शिष्टमंडळ आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते.

त्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून मनसेच्या वतीने याचा पाठपुरावा केला जात होता. या तक्रारीची दखल घेऊन आरोग्यमंत्री यड्रावकर यांनी राज्यातील कोरोना काळामध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी काम केले आहे त्यांचा राहिलेला पगार देण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत.