ichalkaranji nagarparishad


इचलकरंजी शहरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न सातत्याने उद्‌भवत आहे. यासाठी पालिकेने ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे आज सकाळी महासत्ता चौकात अतिक्रमण करून नाश्ता सेंटर चालवणार्‍या गाड्यावर पालिकेचे (municipality) अतिक्रमण निर्मूलन पथकाने अॅक्शन घेत थेतील त्यांचे गाडे हलवण्यात आले आहे.

अतिक्रमण निर्मूलन पथक


अनेक दिवसांपासून शहरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न चर्चेत आहे.
सायंकाळनंतर तर उघड्यावर मांसाहारी खाद्य पदार्थ विक्री करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पालिकेकडून केवळ भुई भाडे वसूल केले जाते; पण शिस्तीकडे दुर्लक्ष केले जाते असा प्रश्न निर्माण झालेला म्हणून पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने फुल्ल अॅक्शन मोडमध्ये काम चालू केले आहेत.

--------------------------------------

Must Read

1) एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

2) आमदाराच्या मुलीच्या लग्नात कलेक्टरांचं मारलं पाकीट

3) बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, दहावीची ३ मेनंतर : शिक्षणमंत्री

4) धक्कादायक! पोलीसच करत आहेत गुंडागर्दी, VIDEO

5) सोन्याची तस्करी चक्क अंडरवेअरमधून

6) अबब... ! करीना कपूर आहे इतक्या कोटींची मालकीण

--------------------------------------

सक्षम पथक हवे 


पालिकेचे (municipality) अतिक्रमण निर्मूलन पथक सक्षम नाही. या पथकाकडे अपुरी यंत्रणा आहे. कारवाई करताना पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळत नाही. राजकीय दबाव ठरलेला आहे. त्यामुळे या पथकाची जबाबदारीही घेण्यास टाळले जाते. या पथकाला सक्षम करण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पथक सक्षम असेल आणि कारवाईत सातत्य असेल तर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणचा प्रश्‍नच उद्‌भवणार नाही, पण या सर्व मूलभूत गोष्टींकडेच पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. 

शासनाच्या निर्णयानुसार पालिकाअंतर्गत शहर फेरीवाला समिती कार्यरत आहे, पण वर्षभरात या समितीची सभाच झालेली नाही. फेरीवाल्यांच्या प्रश्‍नावर चर्चा होऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी ही समिती आहे, पण तिचे अस्तित्व नसल्यातच जमा आहे.