ichalkaranji-gujri-peth-corona-peshant

(coronavirus) 
इचलकरंजीत (Ichalkarnaji) गेल्या काही दिवसांपासून रूग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, मंगळवारी प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार गावभाग गुजरीपेठेत नव्याने तीन रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी रूग्ण संख्या झाली होती. त्याचा हॉटस्पॉट इचलकरंजी शहर बनले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत कमालीची घट दिसून येत होती. शहरात आज अखेर ४०२१ इतकी रूग्ण संख्या झाली आहे. तर कोरोनावर मात करून घरी गेलेल्यांची संख्या ३८२४ झाली आहे. कोरोनामुळे आजअखेर तब्बल १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. (coronavirus)  सध्या तीन अॅक्टीव्ह रूग्णावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी नव्याने तीन रूग्णांची भर पडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.