ichalkaranji-crime

(crime)
 
शिरढोण (ता.शिरोळ) येथे शेतमजूर महिलेच्या मानेवर धारदार शस्त्राने अज्ञात व्यक्तीकडून खून (Blood) झाल्याची  घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. शोभा सदाशिव खोत (वय 42, रा. कोईक वसाहत, शिरढोण) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबतची वर्दी स्वप्निल खोत यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली.  या घटनेची महिती मिळताच इचलकरंजी विभागाचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. 

खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलाशोभा खोत या गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या  राजू मोरडे यांच्या शेतात शेतमजूरीसाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास शेतमजुरीचे काम आटपून चार्‍याचे गाठोडे घेऊन घराकडे परतत असताना  किशोर  माणगावे यांच्या शेतामध्ये सदर महिलेच्या मानेवर पाठीमागून  धारधार शस्त्राने वार केल्याने त्यांचा (crime) मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनास्थळी चार्‍याचा गाठोडे पडले तर हातामध्ये मोबाईल पकडलेला होता.

इतर महिला मजुरी करुन परतत असताना खूनाची घटना उघडकीस आली. खून झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळ परिसरात खुनासाठी वापरण्यात आलेल्या हत्याराचा शोध घेतला मात्र काहीही आढळून आले नाही. मृत महिलेच्या पश्चात  मुलगा व  विवाहित मुलगी आहे.

दरम्यान, अज्ञात व्यक्ती खून करून फरारी झाली आहे. त्यामुळे खुनी कोण हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मृत महिलेच्या हातात मोबाईल होता. पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून या मोबाईलवरून खून्यापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.