ichalkaranji-crime

(Crime) इचलकरंजी येथे २५ लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी मोका न्यायालयीन कोठडीत असलेला अभिजित सुभाष जामदार (रा. गावभाग.इचलकरंजी)यास येथील विशेष मोका न्यायालयाने जामीन मंजूर केला.आर.के नगरमध्ये राहणारे नरेंद्र भोरे व त्याची पत्नी यांच्यात सोडपत्रावरून न्यायालयात वाद सुरू होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी लाखाची खंडणीमागीतल्याप्रकरणी संजय तेलनाडे, सुनिल तेलनाडे, अभिजित जामदार यांच्यासह १२ जणांवर शहापूर पोलीसात गुन्हा दाखल केला होता.(Crime) त्यानंतर या सर्वांवर पोलीसांनी मोका अंतर्गत कारवाई केली होती.यातील संशयीत आरोपी अभिजित जामदार याला जामिन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. यावर सुनावणी होवून न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिले.