money


पैशाभोवतीच (money) सारी दुनिया फिरते असे म्हणतातच. पण बहुतेक लोक पैसा मिळविण्याचे धोपट मार्गच स्वीकारताना दिसतात. म्हणजे नोकरी, व्यवसाय, एखादा उद्योग असे. बँकांवर डल्ले मारणे, अपहरण करणे, खंडण्या उकळणे, चोर्‍या दरोडे घालणे, जुगार खेळून पैसा मिळविणे हेही कांही मार्ग आहेत पण ते सर्रास कुणीही हाताळू शकत नाही. आपल्याला कदाचित माहिती नसेल पण या शिवायही अन्य कायदेशीर मार्गानेही लोक अमाप पैसा (real ways to make money) कमावतात. यातील कांही पद्धती हास्यास्पदही वाटतील पण त्यातूनही पैसा खूप मिळतो बरं का!

1) मानवी केस विक्री

जगात आज हा व्यवसाय तेजीत आहे. ज्यांना लांब, सुंदर केसांचे वरदान आहे अशा महिला यातून मोठी कमाई करू शकतात. कलप न वापरलेले व डाय न केलेले केस असतील तर त्याला प्रचंड किंमत मिळते. हे केस विग बनविणे, गंगावने बनविणे यासाठी वापरले जातात. हा पूर्णपणे कायदेशीर व्यवसाय आहे. अनेक महिला जाणीवपूर्वक केस वाढवितात आणि ते कापून विक्री करतात. कांही वेळा आर्थिक गरज भागविण्यासाठीही हे केले जाते.यात भारत आणि रशिया हे दोन देश आघाडीवर आहेत. इतकेच नव्हे तर ब्रिटीश सिंगर मेलियाने या उद्योगावर एक डॉक्युमेंटरीही बनविली होती.

--------------------------------------

Must Read
--------------------------------------

2)कंपनी लोगोचे टी शर्ट घालणे

हे वाचून तुम्हाला असे वाटत असेल की यातून कितीसा पैसा (money) मिळणार तर तुम्ही चूक करताय. ही कल्पना आगळीवेगळी आहे खरी. ती सुचली जेसन सँडलर या युवकाला २००५ साली. त्याने अनेक कंपन्यांचा पाठपुरावा केला आणि त्यांच्या कंपन्यांचे लोगो असलेले टीशर्ट वापरण्याची तयारी दाखविली. जेथे तो हे टीशर्ट घालेल तेथे कंपनीविषयीची माहितीही तो देणार होता. कंपन्यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी जेसनला त्यासाठी फी देणे सुरू केले. बघता बघता हा व्यवसाय इतका वाढलाय की जेसनने चार पगारी टीशर्ट वेअरर ठेवले आहेत. मागणीच प्रचंड आहे त्याला तो काय करणार? गेल्या पाच वर्षात त्याने त्याची फीही वाढविली आहे. सध्या त्याची वर्षाची कमाई आहे ५ लाख डॉलर्स.

3) गेमिंग

व्हिडीओ गेमिंग जेव्हा प्रथमच मेनस्ट्रीममध्ये आले तेव्हा पालक आणि उद्योग जगत ही मुलाबाळांच्या करमणुकीची सोय म्हणून त्याकडे पाहात होते. केवळ छंद म्हणून हे खेळ खेळायचे त्यातून कितीसा पैसा कंपन्यांना मिळणार असेच सुरवातीला वाटत होते. मात्र आज हा उद्योग जगातला सर्वात एक्सायटिंग आणि आणि सर्वाधिक फायदेशीर उद्योग आहे. अनेकांनी प्रोफेशनल गेमर्स म्हणून मान्यता मिळविली आहे. त्यांच्या स्पर्धा होतात आणि त्यात लक्षावधी डॉलर्सची बक्षीसे दिली जातात. इतकेच नव्हे तर ऑनलाईन लक्षावधी प्रेक्षक या स्पर्धा पाहतात. द इंटरनॅशनल या प्रसिद्ध स्पर्धेचे बक्षीस आहे १० लाख डॉलर्स.

4)ओशिआ

जपानमधली मोठी शहरे म्हणजे कंजस्टेड स्पॉट बनली आहेत. कामांच्या वेळात स्टेशनवर होणारी गर्दी आणि त्यातून गाडीत जागा मिळविणे म्हणजे दिव्यच. त्यामुळे तेथे ओशिआंचा व्यवसाय तेजीत आहे. जपानमधील अनेक स्टेशन्शनी असे ओशिया चांगले पैसे मोजून कामावर ठेवले आहेत.काय करतात हे लोक? तर गाडी अगदी तुडुंब भरून आली तरी स्टेशनवरील लोकांना गाडीची दारे बंद व्हायच्या आत गाडीत ढकलतात. तसेच टॅक्सीमध्ये चढण्यासाठी लोक फारच गर्दी करू लागले तर त्यांना बाहेर खेचतातही. म्हणजे लोकांना गर्दीच्या डब्यात घुसविणे आणि टॅक्सीत गर्दी करणार्‍याना बाहेर खेचणे हे त्यांचे काम.

5 ) सेलिंग डर्ट

नावावरून फारसा बोध झाला नाही का? हा व्यवसाय म्हणजे लोकांच्या भावनांना हात घालण्याचा व त्यातून पैसा मिळविण्याचा व्यवसाय आहे. पट बर्क या आयर्लंडमधील नागरिकाची ही भन्नाट कल्पना. आयर्लंड सोडून अन्य ठिकाणी स्थायिक झालेल्या लोकांच्या मरणाचा फायदा हा उठवतो. म्हणजे आपल्या देशाच्या मातीची ओढ कुणालाही असतेच. अशा परदेशस्थ लोकांच्या धडग्यांवर मातृभूमीतील माती पडावी यासाठी तो आयर्लंडमधील मातीचे बॉक्स विकतो. एक बॉक्स १५ डॉलर्सला देतो शिवाय घरपोच डिलिव्हरी. खोटे वाटेल पण बर्कचा हा व्यवसाय त्याला वर्षाला १० लाख डॉलर्सची कमाई करून (real ways to make money)  देतो.

6) प्रोफेशनल स्लीपर्स

झोपून पैसा कसा मिळवायचा याचा उत्तम नमुना म्हणजे हा उद्योग. बाजारात कोणतेही उत्पादन आणायचे तर त्याच्या अनेक प्रकारच्या चाचण्या अगोदर केल्या जातात. बेड, मॅट्रेसेस ही उत्पादनेही त्याला अपवाद नाहीत. या कंपन्या आपल्या उत्पादनांच्या चाचण्या घेण्यासाठी प्रोफेशनल स्लीपर्स म्हणजे पैसे घेऊन झोपणारे लोक हायर करतात. ते आराम करत असताना त्यांचा हार्टरेट मॉनिटर केला जातो. त्यातून बेड अथवा मॅट्रेसेस किती आरामदायक आहेत याच्या चाचण्या घेतल्या जातात. हेलसिंकीतील हॉटेल फिन गतवर्षी चर्चेत आले ते याच कारणावरून. त्यांनी आपल्या हॉटेलमधील रूम्स किती आरामदायक आहेत याची चाचणी घेण्यासाठी प्रोफेशनल स्लिपर्ससाठी जॉब व्हेकन्सी असल्याची जाहिरात दिली आणि त्यांच्या या कामासाठी ६०० अर्ज आलेही.