bird fluबर्ड फ्लू (bird flu ) या विषाणूने जगभरात धुमाकूळ घालायला पुन्हा सुरूवात केली. या संकटाशी कसेबसे दोन हात केले जात असतानाच आता बातमी येऊन धडकली आहे की, भारतातील ५ राज्यांत मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लूचा (bird flu symptoms) आजार पसरत आहे. झपाट्याने पसरणा-या या तापाला एवियन इन्फ्लूएंजा वायरस (H5N1) या नावाने ओळखले जाते पण साधारण भाषेत याला बर्ड फ्लू असं म्हणतात. देशाच्या विविध राज्यांत अलर्ट जारी केला आहे आणि याच्या प्रतिबंधाची मोठी तयारी केली जात आहे.

प्रतिबंधक उपाययोजना

 • खास करून बर्ड फ्लू H5N1 virus व्हायरस हा पक्ष्यांमध्ये आढळून येतो. त्यामुळे जे लोक मीट सप्लाय करतात त्यांनी काळजी घेतली पाहिजे की फुड चेनमध्ये कोणताच असा पक्षी आला नाही पाहिजे जो संक्रमित आहे.
 • सरकारी आदेशांनुसार पोल्ट्री फुड प्रोडक्ट्सच्या विक्रीवर प्रतिबंध आणले गेले आहेत व याच्या सेवनावरही बंदी घातली गेली आहे. तुम्ही कोणत्याही पोल्ट्री प्रोडक्ट्सचं सेवन करत असाल तर ते ७० डिग्री सेल्सियस किंवा त्याच्यापेक्षा जास्त आचेवर शिजवून घ्या.
 • कच्च्या व शिजवलेल्या चिकनसाठी वेगवेगळे चाकू व भांडी वापरण्याचा सल्ला देण्याचा सल्ला दिला गेला आहे.
 • कच्ची किंवा उकळलेली कोणतीही अंडी खाणं टाळा.

---------------------------------

एखादी व्यक्ती तेव्हाच बर्ड फ्लूचा शिकार होऊ शकते जेव्हा ती संक्रमित असलेल्या पक्ष्याच्या किंवा प्राण्याच्या कोणत्याही रूपाने संपर्कात येईल. याव्यतिरिक्त त्या लोकांनाही बर्ड फ्लू किंवा संक्रमणाचा धोका जास्त आहे जे लोक अंडी किंवा चिकन चांगलं शिजवून खात नाहीत. म्हणून मांसाहार करायचाच असेल तर स्वच्छ धुवून व चांगलं शिजवून मगच करा.


तुलनेत लवकर निदर्शनास येतात. बर्ड फ्लूची लक्षणे पुढीलप्रमाणे (bird flu symptoms) :-


 • श्वासोच्छवासामध्ये अडथळे येणे
 • खोकल्याची समस्या
 • कफ जमा होणे
 • डोकेदुखी
 • मळमळणे
 • तापासह शरीर आखडणे
 • शारीरिक वेदना
 • थोडेसे काम केल्यानंतर थकवा जाणवणे
 • पोटदुखी
 • वारंवार सर्दी आणि नाक वाहणे यामुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता
 • डोळे जळजळणे आणि पाणी वाहण्याची समस्या
 • श्वास घेताना त्रास होणे
 • बर्ड फ्लूच्या संक्रमणामुळे किडनी खराब होण्याची शक्यता
 • हृदयाची गती सामान्य नसणे, यामुळे हृदय विकाराचा धोका निर्माण होऊ शकतो.