breastfeedinghealth tips- इतर अन्नाबरोबर वयाच्या दोन वर्षांपर्यंत स्तनपान करणे योग्य वाटते. माता आणि मूल हवा तितका काळ स्तनपानाचा (breastfeeding) आनंद घेऊ शकतात, असे एनएचएसच्या वेबसाइटवर म्हटले आहे. तसचे स्तनपान दोन वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक काळ सुरू ठेवू शकता, यावर जागतिक आरोग्य संघटनाही सहमत आहे. पण रॉयल कॉलेज ऑफ पेडिअ‍ॅट्रिक्स अँड चाईल्ड हेल्थ डॉ. मॅक्स डेव्ह यांनी म्हटले आहे की, दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बालकांना स्तनपान दिल्याने त्यांच्या आरोग्याला अधिक लाभ होत असल्याचे फारसे पुरावे उपलब्ध नाहीत.

काय सांगतात तज्ज्ञ

* बाळाला स्तनपान सुरू ठेवावे की बंद करावे, हा विषय अनेक बाबींशी निगडित आहे. कामावर परत रुजू होणे, मित्रमैत्रिणींचा आणि कुटुंबाचा पाठिंबा, तसेच आत्मविश्वासाने स्तनपान देणे अशा अनेक गोष्टींचा यात समावेश होतो.

* डॉ. मॅक्स डेव्ह म्हणतात, स्तनपान ही अतिशय वैयक्तिक बाब आहे. स्तनपानामुळे (breastfeeding) आई आणि मुलातील नाते दृढ होते आणि त्यानी काहीच धोका होत नाही. त्यामुळे जे सोयीचे आहे त्यानुसार कुटुंबाने निर्णय घ्यावा.

-------------------------------------

Must Read

1) ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना दणका

2) “आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे का गप्प आहेत”

3) इचलकरंजीत धारदार शस्त्राने युवकाचा निर्घृण खून

-------------------------------------

* आईचे दूध बाळासाठी पहिल्या सहा महिन्यांसाठी अत्यावश्यक असते. त्याशिवाय काहीही दिले जाऊ नये, असा सल्ला दिला जातो. 6 महिन्यांनंतर इतर अन्न दिले जाते. बाळाचे आरोग्य उत्तम राहावे, हेच यामागचे मुख्य कारण आहे.

* यूकेमध्ये 80 टक्के स्त्रिया बाळांना स्तनपान देतात. पण यातील अनेकजणी बाळाच्या जन्मानंतर काही आठवडयांतच स्तनपान देणे बंद करतात. मूल सहा महिन्याचे झाल्यावर फक्त एक तृतीयांश बालकांना आईचे दूध मिळते आणि एक वर्षांचे झाल्यावर हे प्रमाण 0.5% एवढे कमी येते.

* स्त्रियांना स्तनपान सुरू केल्यानंतर काही काळ त्रास होऊ शकतो पण त्यांना नेहमीच योग्य सल्ला मिळतोच असे नाही, असे बालआरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.