ItchingHealth tips- अनेकदा हाताला किंवा पायाला खाज (Itching) सुटण्याची समस्या उद्भवते. याची विविध कारणं असू शकतं. काही उपाय करूनही शरीरावर येणारी ही खाज (Itching) कमी केली जाऊ शकते. आज आपण यासाठी काही सोपे घरगुती उपाय (home remedies) जाणून घेणार आहोत जे तुमच्या शरीरावर किंवा हातापायांना येणारी खाज दूर करू शकतात.

1) कोरफड – शरीरावर खाज येत असेल तर त्याठिकाणी कोरफडीचा गर किंवा त्याचं जेल लावावं. काही वेळ ठेवल्यानंतर तो भाग पाण्यानं स्वच्छ करून घ्यावा. यामुळं खाज आलेल्या भागावर कोणत्याही प्रकारचे लाल चट्टे येत नाहीत.

2) पेट्रोलियम जेली – पेट्रोलियम जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्यानं खाज येत असलेल्या जागेवर ती लावू शकता. ही जेली लावल्यामुळं शरीरावरील खाज कमी होते. त्यामुळं त्वचेचं नुकसान होत नाही.

---------------------------------

Must Read

1) जिओची डीलरशिप हवीय? आमिषाला बळी पडू नका; १ कोटी १० लाखांची फसवणूक

2) कोरोना लसीकरणाची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

3) राजर्षी छत्रपती शाहू समाधीकरिता आठ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

---------------------------------

3) खोबरेल तेल – त्वचा कोरडी पडल्यानं किंवा एखाद्या कीटकानं दंश केला तर त्याठिकाणी खाज येते. सतत एकाच ठिकाणी खाजवलं तर त्याठिकाणी लाल चट्टे येतात. असं असेल तर खाज येत असलेल्या भागावर खोबरेल तेल लावावं. यामुळं शरीरावरील खाज कमी होते.(home remedies)

4) तुळस – शरीरावर एखाद्या ठिकाणी खाज (Itching)  सुटली असेल तर त्याठिकाणी तुळशीची काही पानं चोळावीत. किंवा या पानांचा काढा बनवूनही तो काढा खाज येत असलेल्या भागावर लावू शकता.

5) ओटमिल – नाष्त्यात ओट्सचं सेवनं सर्रास केलं जातं. यात अनेक गुणधर्म असतात. ओटमीलपासून तयार केलेली पावडरही तितकीच उपयुक्त आहे. या पावडरमध्ये अँटीइंफ्लेमेटरी प्रॉपर्टीजचं प्रमाण असतं. त्यामुळं खाज सुटलेल्या भागावर ही पावडर लावली तर खाज कमी होऊन पुरळ आले असतील तर ते कमी होतात. त्यासाठी एक कप पावडरमध्ये थोडसं पाणी मिसळून याची घट्ट पेस्ट तयार करावी. ही पेस्ट खाज सुटलेल्या भागावर लावून थोड्या वेळानं कोमट पाण्यानं हा लेप काढावा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.