coriander benefits for healthhealth tips- कोणताही पदार्थ बनवताना त्यात कोथिंबिरीचा सर्रास वापर केला जातो. चवीसाठी किंवा एखाद्या पदार्थाच्या सजावटीसाठी वापरली जाणारी कोथिंबीर (coriander benefits for health)आरोग्यासाठी खूप गुणकारी देखील असते. आज आपण याच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

कोथिंबीर खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –

1) कोथिंबीरीची (coriander benefits for health) चटणी शरीरासाठी खूप गुणकारी असते. रोज जेवताना याचं सेवन केलं तर अपचन, आम्लिपत्त, जेवणावरील इच्छा कमी होणं, पोटात गॅस होणं अशा समस्या दूर होतात.

2) रोज सकाळी कोथिंबीरीची 10-12 पानं आणि पुदीन्याची 7-8 पानं पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्यावं. यामुळं शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात.

----------------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीच्या दौरावर दोन गवे

2) पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

3) मनसेचे बाळा नांदगावकर 'ठाकरे सरकार'वर संतापले

----------------------------------------------

3) कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.

4) डोळ्यांची आग होत असेल, डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण झाली असतील तर अशा विकारांमध्ये कोथिंबीर गुणकारी आहे.

5) रोगप्रतिकारक (immunity) शक्ती वाढवण्यासाठी आणि शारीरिक थकवा दूर करण्यासाठी 2 चमचे धने आणि अर्धा इंच आलं हे सारं एक ग्लास पाण्यात उकळावं. त्यानंतर या पाण्यात गूळ घालून ते आटवावं आणि धन्याचा चहा प्यावा. त्यामुळं भूक वाढते.

6) आम्लपित्तामुळं घशात आणि छातीत जळजळ होत असेल आणि घशापाशी आंबटपाणी येत असेल तर एक चमचा धनेपूड आणि एक चमचा खडीसाखर (बारीक केलेली) यांचं मिश्रण दिवसातून दोन तीन वेळा घ्यावं त्यामुळं आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

7) कोथिंबीरीच्या सेवनामुळं हातापायांची जळजळ कमी होते.

8) वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.

9) खोकल्यावर खात्रीशीर उपाय म्हणून धन्याचा उपयोग केला जातो. धनेपूड, सुंठ व पिपळी चूर्ण समप्रमाणात घेऊन मधातून सकाळ संध्याकाळ चाटण करावं. असं केल्यानं खोकला हळूहळू कमी होऊन नष्ट होतो.

10) गर्भवती महिलांना अनेकदा उलटीचा त्रास होतो. अशा वेळी धने पूड एक चमचा आणि 10 ग्रॅम खडीसाखर हे पाण्यात मिसळून ते पाणी थोड्या थोड्या वेळानं घोट घोट पीत रहावं.

कोथिंबीरीचे औषधी गुणधर्म –

कोथिंबीर ही शीत गुणात्मक, अग्निदीपक, पाचक, तृष्णाशामक मूत्रल आहे. तसंच तिच्यात कॅल्शियम फॉस्फरस, लोह, अ, ब, क जीवनसत्व, पोटॅशियम, प्रथिने स्निग्धता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ असतात. या सर्व गुणधर्मांमुळं कोथिंबीरीचा आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणून वापर केला जातो.