politics news - हाडे गोठवणार्‍या कडाक्याच्या थंडीतही दिल्‍लीत आंदोलनात शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (pm narendra modi) त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आंदोलन संपवावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

गडहिंग्लजमध्ये सलोखा परिषदेच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय शेतकरी (farmers right) आंदोलनाला मंत्री मुश्रीफ यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, केंद्राने चर्चा न करता हा अन्यायकारक कायदा लागू केला असून, त्याविरोधात पंजाब व हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. 

केंद्राने हे कायदे मागे घेऊन शेतकर्‍यांची हाक ऐकावी. एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला हरताळ फासत शेतकरीविरोधी निर्णय घेणारे व आंदोलनाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरीकडे मात्र 'मन की बात'मधून मुक्‍त चिंतन करताना दिसत आहेत.

------------------------------------

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसच्या विळख्यात सापडणार जग

2) IndvsAus : रोहित शर्मासह या ४ खेळाडूंवर कारवाईची शक्यता

3) तुम्ही ही गिझर वापरताय तर सावधान!

4) धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने केले वार

-------------------------------------

अशावेळी पंतप्रधान मोदींना शेतकर्‍यांशी (farmers right) बोलायला मात्र अपमान वाटत आहे. यावेळी सलोखा परिषदेच्या वतीने प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनावेळी माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, नगराध्यक्षा स्वाती कोरी, प्रा. किसनराव कुराडे, कॉ. संपत देसाई, अरविंद बारदेस्कर यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.