rcb teamIPL 2021:
आयपीएलच्या १४ व्या हंगमापूर्वी विराट कोहलीच्या (virat kohli) आरसीबीनं दिल्लीच्या दोन अष्टपैलू खेळाडूंना संघात घेतलं आहे. दुबई येथे झालेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात दिल्लीकडून खेळणाऱ्या हर्षल पटेल आणि डॅनिअल सॅम्स यंदाच्या हंगामात आरसीबीकडून खेळताना (sports news) दिसतील. शुक्रवारी दिल्लीनं या दोन्ही खेळाडूंना आरसीबीसोबत ट्रेड केलं आहे.

आयपीएल (IPL) २०२१ च्या लिलावापूर्वी ४ फेब्रुवारीपर्यंत ट्रेडिंग विंडो सुरु राहणार आहे. यामध्ये दोन संघ अपापसांत चर्चा करुन खेळाडूंची देवाणघेवाण अथा विकत घेऊ शकतात. आरसीबीनं दिल्लीकडून शुक्रवारी हर्षल पटेल आणि डॅनिअल सॅम्स यांना घेतलं आहे. दिल्ली आणि आरसीबीनं आपल्या अधिकृत ट्विटवरुन याची माहिती दिली आहे.


--------------------------------

Must Read

📺 फक्त ११३० रुपयात घरी घेऊन जा ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही

📲 सर्व मेसेजिंग Apps आता इथे एकाच ठिकाणी मिळणार

🏏 बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिके

--------------------------------हर्षल पटेल आणि डॅनियल सॅम्स आरसीबीसाठी तुरुफ का इक्का ठरु शकतात. कारण, आरसीबीनं २०२१ पूर्वी अनेक अष्टपैलू खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. यामध्ये ख्रिस मॉरिस आणि मोईन अलीसारख्या खेळाडूचा समावेश आहे.

हर्षल पटेलने आयपीएलमध्ये खेळलेल्या ४८ सामन्यात ४६ विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय तळाला चांगली फलंदाजीही करु शकतो. ऑस्ट्रेलियाचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज डॅनिअल सॅम्सही फटकेबाजी करण्यात पटाईत आहे. सॅम्सने ५१ टी-२० सामन्यात ६३ बळी घेतले आहे. डॅनिअल सॅम्सनं बिग बॅश लीगमध्ये दोन अर्धशतकंही झळकावली आहेत.