good life partner qualities


या गोष्टीत काहीच शंका नाही की मुलांना अशाच मुली खूप लवकर आवडतात ज्या दिसायला खूप सुंदर व आकर्षित असतील. मुलं फक्त अशा मुलींच्या रंग-रुपावर भाळतच नाही तर क्षणार्धात त्यांच्या मनात तिला गलफ्रेंड बनवण्याची स्वप्न जन्म घेऊ लागतात. मग त्या मुलीला इम्प्रेश करण्यासाठी देव जाणे ते काय काय युक्त्या लढवतात. पण हो, जेव्हा प्रश्न आयुष्यभराचा जोडीदार (life partner) निवडण्याचा येतो तेव्हा मुलं आकर्षण या गोष्टीला मागे सोडून मुलींमधील अशी अनेक गोष्टी तपासतात.

ज्या गोष्टी नात्यातील संतुलन कायम ठेवतील अशा गोष्टींसोबतच ती माझ्याबद्दल काय विचार करते? तिला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? कुटुंबाबद्दल तिचे काय विचार आहेत? कुटुंबातील लहान मुलांबद्दल तिची वागणुक कशी आहे? एकत्र कुटुंबात ही रुळू शकते का व सर्वांना जोडून ठेऊ शकेल का? या गोष्टी अगदी निरखून-पारखून घेतात. पण याव्यतिरिक्तही काही गोष्टी असतात ज्या आपल्या पत्नीमध्ये असणं मुलांना अत्यंत गरजेचं वाटतं. त्या गोष्टी कोणत्या हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

--------------------------------------

Must Read
--------------------------------------

कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारी

मुलांना अशा मुली खूप लवकर आवडतात ज्या नव-यासोबतच घरातील सर्व सदस्यांसोबत प्रेमाने वागतील व त्यांना आपल्या माहेरच्या मंडळींप्रमाणे सन्मान देतील. त्यामुळे ज्या मुली लग्नाच्या आधीपासूनच नव-याच्या घरातील व्यक्तींशी संवाद साधतात व बोलण्या बोलण्यातून त्यांना आपलंसं करतात अशा मुली मुलांना पत्नी म्हणून हव्याहव्याश्या वाटतात. तर आपल्या माहेरच्या व सासरच्या लोकांमध्ये भेदभाव करणा-या मुली व सतत असं बोलण्यातून जाणवून देणा-या मुली मुलांना अजिबात आवडत (good life partner qualities) नाहीत.

जबरदस्ती न करणारी

थोपत राहतील व आपल्या मतांवर अडून राहतील. अशा मुली खूप जिद्दी असल्यामुळे आपल्या मनातील गोष्ट त्यांच्याकडून पूर्ण करून घेणं अत्यंत कठीण असतं. त्यामुळे ज्या मुली एका हेल्दी रिलेशनशीपसाठी काय गरजेचं आहे हे ओळखून तसं वागण्याचा प्रयत्न करतात त्या मुली मुलांना प्रचंड आवडतात. प्रत्येक गोष्टीत संशय घेणा-या व उगाचच काहीतरी कमी काढत बसणा-या मुलींपासून मुलं दूर पळण्याचा प्रयत्न करतात.

मुलांना त्या मुली जोडीदार  म्हणून हव्या असतात ज्या ही गोष्ट चांगली ओळखतात की आयुष्यात नात्यांपेक्षा (relationship) काहीही जास्त महत्त्वाचं नाही. मग ते नातं मैत्रीचं असो वा पती-पत्नीचं! ज्या मुली आयुष्यातील मित्रांचे महत्त्व जाणतात त्या सहजपणे कोणाचंही मन जिंकू शकतात. कारण बहुतांश मुलींना आपल्या जोडीदाराची मित्रमंडळी व त्यांच्याशी जास्त जवळीक पसंत नसते. ती सतत हीच तक्रार करत राहते की मला वेळ देण्याऐवजी तू मित्रांसोबतच जास्त काळ असतो. यावरून नात्यात सतत वाद होऊ लागतात व शांती भंग होते. मग अशा मुलींपासून मुलं चार हात लांब राहू लागतात.

सरप्राईज देणा-या मुली (life partner)

अशा मुली मुलांच्या मनात खूप लवकर स्थान बनवू शकतात ज्या आपल्या आवडी-निवडी सोबतच त्याच्याही पसंत नापंसतीची आवर्जून काळजी घेतात. मुलींना छोट्या छोट्या गोष्टींची खूप चांगली पारख असते त्यामुळे जोडीदारासाठी काहीतरी खास केल्याने दोघेही एकमेकांच्या अधिक जवळ येतात. मुली रोमॅंटिक व हळव्या असल्या तरी मुलांनाही नकळत आपली आवड जपणा-या मुली खूप आवडतात. म्हणूनच आधी जोडीदाराच्या इच्छा-अपेक्षा जाणून घ्या व नंतर त्यांना सरप्राईज द्या. याने प्रेम व नातं अधिक वृद्धिंगत होईल.

नटणं-थटणंही जाणतात

मुलांना आळशी मुली अजिबात आवडत नाहीत. अनेक मुली अशा असतात ज्यांचा फॅशन आणि स्टाइलशी काहीच देणंघेणंच नसतं. त्यांना वाटतं की साफ व ठीकठाक फिटिंगचे कपडे घातल्यानंतर आपण जोडीदाराला आवडू शकतो. पण सत्याता काही औरच असते. प्रत्येक मुलाची अपेक्षा असते की आपली होणारी पत्नी इतर मुलींपेक्षा सुंदर, टापटीपीत व स्टाइलिश असावी. त्यामुळे ज्या मुली कुटुंबाची जबाबदारी पार (good life partner qualities)  पाडता पाडता स्वत:कडेही कटाक्षाने लक्ष देतात त्या मुली खूप कमी वेळात सर्वांच्याच लाडक्या बनतात.