gold rategold silver price today- जागतिक बाजारपेठांमध्ये सपाट पातळीवरील व्यवसायानंतर आज सोन्या-चांदीच्या किंमती ( Gold silver rate) घसरल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीचा वायदा भाव 0.25 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 50,775 रुपयांवर आला आहे. गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा ही घसरण दिसून आली. पहिल्या सत्रात सोन्याच्या किंमतीत 0.85 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तथापि, एकाच दिवसात प्रति दहा ग्रॅम 1,200 रुपयांपर्यंत घसरल्यानंतर ही तेजी आली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर सोन्याची किंमत आतापर्यंत प्रति 10 ग्रॅम 6,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

जागतिक बाजारातही सोन्याची घसरण झाली

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत (gold silver price today )किंचित घट दिसून आली. अमेरिकन डॉलरची मजबुती आणि बाँडच्या उत्पन्नात वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत ही सुस्ती दिसून आली आहे. तथापि, जो बिडेनच्या प्रशासनाने आणखी एका मदत पॅकेजेसच्या आशेने सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण होण्यापासून वाचवले. स्पॉट सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी घसरून 1,911.32 डॉलर प्रति औंस झाले. मात्र, गेल्या एका आठवड्याच्या आधारे यात 0.7 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

-------------------------------------------

Must Read

1) अभिजित जामदार याला जामीन

2) कोल्हापुरात एका दिवसात 10 नवे कोरोनाबाधित

3) गडकरींनी दिली Fastag बद्दल महत्त्वाची माहिती

---------------------------------------------

गोल्ड ईटीएफ मध्ये अजूनही सुस्तीचा काळ पाहायला मिळत आहे. जगातील सर्वात मोठा एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच ईटीएफ, एसपीडीआर गोल्ड ट्रस्टचा एकूण होल्डिंग 0.4 टक्क्यांनी घसरून 1,182.11 टन झाला आहे.

सोन्याव्यतिरिक्त ( Gold silver rate)  चांदीच्या किंमतींबद्दल बघितले तर त्यात 0.2 टक्क्यांनी घट झाली आहे, त्यानंतर ती प्रति औंस 27.05 डॉलरवर आली आहे. औद्योगिक मागणीसंदर्भात आऊटलूक चांगले असल्याने चांदीच्या किंमतींना सपोर्ट मिळेल.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोविड लसीच्या बातम्या मदत पॅकेजवर भारी पडतील. अशा परिस्थितीत अजूनही बाजारात चढउतार पाहायला मिळेल. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारामधील सोन्याच्या किंमतीत 714 रुपयांनी घट झाली आहे. त्यानंतर, नवीन सोन्याची किंमत येथे प्रति 10 ग्रॅम 50,335 रुपयांवर आली. चांदीच्या भावातही घसरण झाली. गुरुवारी चांदी 386 रुपये प्रतिकिलोने स्वस्त झाली आहे आणि आता 69,708 रुपयांवर आली आहे.