Gold Silver Price Today


आज मकरसंक्रांत सण आहे. त्यामुळे जर तुम्ही आजच्या दिवशी तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात पुन्हा घसरण झालीय (Gold Silver Price Today). तर चांदीचे भावही 300 रुपयांनी घसरले आहेत. मुंबईत 24 कॅरेट आजचा सोन्याचा भाव 49 हजार 450 रुपये प्रति तोळा आहे. तर, मुंबईत चांदीचा भाव 66 हजार रुपये प्रति किलोवर घसरला आहे. तर, मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 48 हजार 450 रुपये प्रति तोळा इतका आहे

आज सकाळी एमसीएक्सवर सोन्याची डिलिव्हरी दिसते. यावेळी फेब्रुवारी डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी 395 रुपयांनी घसरुन 48,910 रुपये झाला. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये सोन्याचा भाव 196 रुपयांच्या वाढीसह प्रतितोळा 49,230 रुपयांवर होता. यावेळी चांदीच्या डिलीव्हरीत घट झाली आहे. मार्च डिलीव्हरीसाठी चांदीचा भाव 721 रुपयांनी घसरुन 65,300 रुपये प्रतिकिलो पातळीवर होता.

--------------------------------------

Must Read
--------------------------------------

तुमच्या शहरात सोन्याचा आजचा भाव (Gold Silver Price Today)काय?

मुंबई –

सोने – 49,450 रुपये प्रति तोळा

चांदी – 66,000 रुपये प्रति किलो

पुणे –

सोने – 49,450 रुपये प्रति तोळा

चांदी – 66,०00 रुपये प्रति किलो

जळगाव –

सोने – 51,021 प्रति तोळा

चांदी – 66,923 प्रति किलो

नागपूर –

सोने – 49,450 रुपये प्रति तोळा

चांदी – 66,000 रुपये प्रति किलो

नाशिक –

सोने – 49,450 रुपये प्रति तोळा

चांदी – 66,000 रुपये प्रति किलो

कोल्हापूर – 

सोने – 50,900 रुपये प्रति तोळा

चांदी – 65,300 रुपये प्रति किलो