gold silver rate today


मुंबईत २२ कॅरेट सोन्यामध्ये १० ग्रॅम सोन्याचा (gold silver rate today) भाव ४८,११० वर पोहोचला तर काल हा भाव ४८,१०० वर होता. चांदीबद्दल बोलायचं झाल्यास आज १० ग्रॅम सोन्याची किंमत ६७१ वर पोहोचली असून कालचा भाव ६६५ रुपये इतका होता. जागतिक बाजारात सेन्सेक्सनं (Sensex) उसळी मारल्यानंतर आता सोन्याचे भावही वधारल्याचं दिसून आलं. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती वाढल्याचं पाहायला मिळालं. आज अमेरिकेत होणाऱ्या हालचालींमुळे सोन्या-चांदीच्या भावांमध्येही वाढ झाल्याचं समोर आलं आहे. 

दरम्यान, जो बायडन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्रपती (US president) बनल्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत जोरदार तेजी पाहायला मिळाली. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेबरोबरच देशांतर्गत बाजारावरही झाला. यावेळी सेन्सेक्स (Sensex) पहिल्यांदाच ५०,००० वर पोहोचला आहे. तर निफ्टी १४,७०० च्या पुढे गेली. 

--------------------------------
Must Read


1) ठाकरे सरकारने आता घेतले 'हे' तीन महत्त्वाचे निर्णय

2) आठ जिल्ह्यात 5 ते 25 मार्चदरम्यान सैन्यभरती

3) ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे म्हणाले…

--------------------------------अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी ट्रेझरी सेक्रेटरी म्हणून जेनेट येलेन यांचं नाव निर्देशित केल्यानं परदेशी बाजारपेठ तसेच भारतीय बाजारपेठेतील सोन्याची चमक वाढली. अशात आज बायडन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यामुळे मार्केट आणखी वाढलं आहे. 

बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारी वायदा व्यापार ०.४३ टक्क्यांवर होताना दिसला. MCX वर १० ग्रॅम सोन्याची किंमत ४९,१९५ रुपयांवर होती. तर चांदीमध्ये मार्च फ्युचर्सच्या व्यापारात ०.६६ टक्क्यांची वाढ झाली असून, ती प्रति किलो ६६.४७२ रुपयांवर व्यापार करताना दिसली.

सोन्याचा भाव : (gold silver rate today)

  • नागपूर ४८११० ४८१००
  • पुणे ४८११० ४८१००
  • नाशिक ४८११० ४८१००
  • नवी दिल्ली ४७९२० ४७९१०
  • हैद्राबाद ४७९२० ४७९१०