molestation


crime news- महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार (molestation) थांबण्याचं काही नाव घेत नाही. दररोज अत्याचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. नुकतीच गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये विनयभंग करून वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्याची घटना घडलीय. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.  दरम्यान घटनेचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत. 

संबंधित तरुणीवरील बलात्काराची (rape) घटना 6 जानेवारीला घडलीय. या घटनेनंतर तरुणीचं मानसिक स्वास्थ खचलं होतं. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिल्याने घडलेला सारा प्रकार समोर आला आहे.

----------------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीच्या दौरावर दोन गवे

2) पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

3) मनसेचे बाळा नांदगावकर 'ठाकरे सरकार'वर संतापले

----------------------------------------------

आरोपीने पीडित तरुणीला (molestation) सीट नंबर तुमची नसल्याचं कारण सांगून मागच्या सीटवर बसवले आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन  बलात्कार केला. तसंच घडलेल्या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकी आरोपीने दिली.पुणे पोलिसांनी वाशिम पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला असून पोलिसांनी घडलेल्या घटनेमधील गुडविल्स कंपनीची ट्रॅव्हल्स जप्त केली आहे.

यासंदर्भात एपीआय महल्ले यांच्या नेतृत्वात पोलिस पथक नागपूरात दाखल झाले असून त्यांना आरोपीचा पत्ता मिळाला. परंतु आरोपी फरार असल्याची माहिती ठाणेदार आधारसिंग सोनवणे यांनी दिली आहे. दरम्यान घटनेचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत.