crime newscrime news- क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत एका सात वर्षांच्या मुलीला नरकयातना दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाईकांकडे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या छोट्याशा चुकीसाठीही अगदी कठोर आणि अमानुष शिक्षा दिली जात होती. संबंधित घटनेचा व्हिडीओ  समोर आल्यानंतर तिच्यावर झालेल्या अन्यायाला (harassments) वाचा फुटली आहे. तिच्या छोट्याशा चुकीसाठी गरम सळईचे आणि जळणाऱ्या सिगारेटचे चटकेही दिले जात होते. आरोपी नातेवाईक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या मुलीची नखंही उपटून काढली होती.

ही घटना राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यातील थानेटा या गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीच्या आईचं निधन झाल्यानंतर तिच्या वडीलांनी दुसरं लग्न केलं आहे. त्यानंतर तो गुजरातमधील सूरत याठिकाणी राहण्यासाठी गेला. त्याने आपल्या पोटच्या मुलीला नातेवाईकांकडे ठेवलं. संबंधित नातेवाईक या 7 वर्षांच्या निष्पाप मुलीकडून घरातील सर्व कामं करून घेत होती. यावेळी तिच्याकडून काहीही चूक झाली तर तिला जबरदस्त शिक्षा दिली जायची.

---------------------------------

Must Read

1) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

2) “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”

3) Bigg Boss14 :- राखी सावंतचा बचाव करणं सलमानला पडलं भारी

---------------------------------

स्थानिक पोलीस अधिकारी गजेंद्र सिंह यांनी सांगितलं की, पीडित मुलीवर अमानुष अत्याचार (harassments) करणारे आरोपी दाम्पत्य किशन सिंह आणि त्याची पत्नी रेखा यांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीला गरम सळईचे चटके, तिची नखं उपटली का? या अनुषंगाने आरोपी दाम्पत्याची चौकशी केली जात आहे. आरोपी दाम्पत्य हे पीडित मुलीचे नातेवाईक आहेत. तर पीडित मुलीचे वडील सूरत येथे मजुरीचे काम करतात. त्यामुळे आपल्या मुलीची योग्य काळजी घेण्यासाठी वडीलांनी तिला गावातील नातेवाईकांकडे ठेवलं होतं. (crime news)

बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा भावना पालीवाल यांनी सांगितलं की, 'या पीडित मुलीकडून घरातील सर्व कामं करून घेतली जात असतं. तिच्या छोट्या चुकांसाठी कठोर शिक्षा दिली जात असे. तिला निर्दयीपणे मारहाण केली जात असे. तिला जेवण दिलं जात नसे. एवढंच नाही तर, तिच्या गुप्तांगात मीर्च पावडर देखील टाकली होती. त्याचबरोबर तिला उलट टांगून मारहाण केली जात असे,' असे अनेक आरोप बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा भावना पालीवाल यांनी केले आहेत.

मुलीला निर्वस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल (video viral) झाल्यानंतर लहान मुलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेने गावात जावून माहिती घेतली. त्यानंतर तिच्याशी बोलल्यानंतर मुलीने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत सांगितलं. त्यानंतर संबंधित संस्थेने याची माहिती पोलीसांना दिली. या अमानुष घटनेनंतरही पोलिसांनी हे प्रकरणा गांभीर्याने घेतलं नाही. तिला पोलीस स्थानकात 8 तास तसंच बसवून ठेवलं. मात्र वरिष्टांनी हस्तक्षेप केल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या पीडित मुलगी बाल कल्याण संस्थेच्या ताब्यात आहे.