तुमच्या आजुबाजुला असे बरेच शेठ, व्यापारी, राजकारणी महागड्या गाड्यांमधून फिरतात. रुबाब हाणतात. त्यांच्याकडे बराच काळा पैसा (black money) किंवा उत्पन्न खूप असते परंतू ते आयकर विभागाला (income tax department) दाखवत नाहीत. अशांबाबत बोटे मोडत बसण्यापेक्षा नामानिराळे राहत त्य़ांची संपत्ती पकडून (corruption)दिल्यास ५ कोटी रुपयांचे हमखास बक्षिस तुम्हाला मिळू शकते. कसे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आयकर विभागाने एक नवीन ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. याद्वारे एखाद्याकडे काळा पैसा (black money), बेफाम संपत्ती किंवा कर चोरल्याची माहिती असेल तर ती थेट सरकारला देता येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने मंगळवारी ही लिंक सुरु केली आहे. सीबीडीटीने सांगितले की ई-फाइलिंग पोर्टल https://www.incometaxindiaefiling.gov.in वर 'कर चोरी किंवा बेनामी मालमत्ता'ची लिंक सुरु केली आहे.
या सुविधेंतर्गत ज्याच्याकडे पॅन किंवा आधार नंबर आहे किंवा ज्याच्याकडे पॅन, आधार नंबर नाहीय तो देखील तक्रार दाखल करू शकणार आहे. या ऑनलाईन सुविधेमध्ये ओटीपी आधारित प्रक्रियेंतर्गत कोणीही आयकर कायदा 1961 चे उल्लंघन, अघोषित संपत्ती कायदा आणि बेनामी व्यवहार कायद्यांतर्गंत तीन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तक्रार दाखल करता येणार आहे.
--------------------------------------
Must Read
1) कृषी कायद्यांना स्थगिती; शरद पवार म्हणतात की...
2) चिंताजनक! राज्यात पुन्हा वाढू लागते कोरोना बळी
3) १६ जानेवारीपासून होणार लसीकरण
--------------------------------------