
(Gas Gijhar) नाशिकमधल्या २६ वर्षांचा समाधान पाटील यांचा गॅस गिझरमुळे (Gas Gijhar) मृत्यू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी जगदीश व्यायाम करून जिममधून परत आला आणि आंघोळ करायला गेला. गॅस गिझर सुरू केला. मात्र आंघोळ करता करता स्वयंपाक घरातून गॅस गिझर मध्ये टाकलेली गॅस लाईन लिक झाली. श्वास कोंडल्याने गौरव पाटील गुदमरून बाथरूममध्ये खाली पडला.
बाथरुममधून बाहेर गॅसचा वास येऊ लागला, त्यावेळेला हे उघड झालं. गिझरमध्ये गॅसचं ज्वलन होतं, त्यावेळी आजूबाजूचा ऑक्सिजन शोषून घेतला जातो. कार्बन मोनोक्साईडचं उत्सर्जन होतं. बाथरुममध्ये व्हेंटिलेशन नसल्यास कार्बन मोनोक्साईड वाढतो. बाथरुममधला ऑक्सिजन संपल्यानं व्यक्तीला ऑक्सिजन मिळत नाही. ती व्यक्ती बेशुद्ध होण्याची शक्यता असते.
गॅस गिझर बाथरुममध्ये न लावता त्याचं फक्त कनेक्शन बाथरुममध्ये घ्या. (Gas Gijhar) बाथरुममध्ये खेळती हवा राहणं आवश्यक आहे. पाणी गरम झाल्यानंतर गिझर बंद करा. गॅस गिझर चालू ठेवून आंघोळ करणं धोकादायक आहे. किंवा इलेक्ट्रीक गॅस गिझरचा वापर करु शकता.गॅस गिझरचा वेळोवेळी मेंटेनन्स केला तर हा धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे अंघोळ करताना अधिक काळजी घ्या.