rape crime case


crime news- राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (rape) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाच पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

हा प्रकार नाशिक रोड परिसरातील आरिंगळे मळ्यात घडला आहे. आरिंगळे मळ्यात रहात असलेल्या पीडित मुलीवर शेजारी राहणाऱ्या कुटुंबानेच अत्याचार (rape) केला. कुटुंबातील सदस्यांनी पीडित मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर आज पुन्हा पीडित मुलीवर त्यांनी अत्याचार केले. पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला.

--------------------------------------------------------------

Must Read 

1) विद्यापीठातील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

2) राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

3) भारताने केलेल्या Air Strike मध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू

4) एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली

5) Marathi Joke : महापावसाळी आघाडी

------------------------------------------------------------

मुलीने घडलेल्या प्रकाराबाबत आईला सांगितल्यानंतर आईला धक्का बसला. तिने तातडीने नाशिक रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पीडित आईच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. (crime news)