नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक परिसरात उभारल्या जाणाऱ्या आर्ट गॅलरी तसेच अन्य विकास कामांकरिता राज्य सरकारतर्फे आठ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महापालिकेत झालेल्या बैठकीत दिले.शाहू मिलच्या जागेतील स्मारक कामाचा विषय मोठा असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी आढावा बैठकीत छत्रपती शाहू समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निधी देण्याची मागणी केली होती.

------------------------------------------

Must Read

1) अभिजित जामदार याला जामीन

2) कोल्हापुरात एका दिवसात 10 नवे कोरोनाबाधित

3) गडकरींनी दिली Fastag बद्दल महत्त्वाची माहिती

---------------------------------------------


पहिल्या टप्प्यात समाधी स्मारक, सुशोभिकरणाची अडीच कोटींची कामे महापालिकेने स्वनिधीतून केली, परंतू दुसऱ्या टप्प्यात नजिकचा बाबासाहेब आंबेडकर हॉलचे नवीन बांधकाम करुन त्याठिकाणी आर्ट गॅलरी करण्यात येणार असल्याचे सरनोबत सांगितले. त्यावेळी आठ कोटी रुपये देण्याची ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली.

शाहू मिलच्या जागेतील शाहू स्मारकाबाबत बैठकीत चर्चा झाली. तेंव्हा हा विषय मोठा असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांनी यासंदर्भात आपण एक आराखडा तयार केला असून तो राज्य सरकारने विचारात घ्यावा, अशी सूचना केली.महापालिकेतर्फे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी प्रलंबित कामांचे तसेच पूर्ण झालेल्या विकास कामांचे सादरीकरण केले.