molestationटिंडर डेटिंग ॲपवर (dating app) ओळख झाल्यानंतर त्याचा गैरफायदा घेत महिलांवर अत्याचार करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी एका एअर होस्टेस तरुणीवर बलात्कार (rape) झाल्याची घटना ताजी असतानाच अशाच प्रकराची आणखी एक घटना समोर आली आहे. टिंडर डेटिंग ॲपवरून ओळख झालेल्या मित्राने एका विधवा महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचे समोर आले आहे. 

अमन दीपक सिंग (वय-29 रा. डांगे चौक, थेरगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 12 जून 2020 पासून 24 सप्टेंबर 202 या कालावधीत जे डी पॅराडाईस ताथवडे, स्टे-इन हॉटेल पुनावळे कम्फर्ट एक्झिक्युटिव्ह हॉटेल मारुंजी, द अदिती इन हॉटेल हिंजवडी या ठिकाणी घडला आहे.

--------------------------------------------------------------

Must Read 

1) विद्यापीठातील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

2) राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

3) भारताने केलेल्या Air Strike मध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू

4) एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली

5) Marathi Joke : महापावसाळी आघाडी

------------------------------------------------------------

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी यांची ओळख टिंडर या डेटिंग ॲपवर (dating app) झाली. त्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. आरोपीने पीडित महिला विधवा असल्याचा फायदा घेत तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. आरोपीने तिच्यावर विविध लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. महिलेनं लग्नाबाबत विचारणा केली असता तिला बुट फेकून मारला. तसेच लग्न करण्यास नकार दिल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संगिता गोडे करीत आहेत.