security number plate

वाहतूक विभागाने (transportation) वाहनांवर एचएसआरपी म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स (security number plate) लावण्याबाबतची नवी मुदत जाहीर केली आहे आणि ही नंबरप्लेट प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या फेऱ्या न मारता घरबसल्या ऑनलाईनवरून घेण्याची सुविधा दिली आहे मात्र बाजारात बनावट नंबर प्लेटचा सुळसुळाट झाल्याने ग्राहकांनी ऑनलाईन नंबर प्लेट घेताना सावधानता बाळगावी असा इशारा दिला गेला आहे.

या प्लेट बनविण्यासाठी सरकारच्या पॅनल मध्ये असलेल्या कंपन्यांनी नकली नंबर प्लेटना अटकाव व्हावा म्हणून अधिकृत www.siam.in  वेबसाईटचा वापर करून प्रक्रिया अर्ज करावा असे म्हटले आहे. यात १२ ऐवजी ६ विकल्पात ग्राहकाने माहिती भरायची असून नंबर प्लेट ७०० ते ७५० रुपयात मिळणार आहे. 

----------------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीच्या दौरावर दोन गवे

2) पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

3) मनसेचे बाळा नांदगावकर 'ठाकरे सरकार'वर संतापले

----------------------------------------------


अनेक वाहन वितरक (transportation) वाहन बुकिंगच्या वेळी सिक्युरिटी नंबर प्लेट (number plate) देण्यास दोन ते चार महिने लावतात. योग्य नंबर प्लेट नसल्याने चलन फाडले जाईल या भीतीने अनेक वाहन मालक ऑनलाईन नंबर प्लेट घेतात आणि त्यातून बनावट नंबर प्लेटचा सुळसुळाट झाल्याचे सांगितले जात आहे.

हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बरोबर वाहनच्या पुढच्या काचेवर कलर कोडेड स्टीकरसह क्रोमियम बेस्ड होलोग्राम स्टीकर असणे गरजेचे आहे. या स्टीकरवर वाहन इंजिन आणि चासी नंबर असतो. गुन्हेगारी आणि कार चोरी सारख्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी या नंबर प्लेट उपयुक्त ठरतील असे सांगितले जात आहे.

कलर कोडेड स्टिकर्स देखील अनिवार्य...

इंधनाची चाचणी घेण्यासाठी रंगीत कोडेड स्टिकर गाडीवर लावले जातील जेणेकरून आपली कार पेट्रोलची आहे की डिझेलची हे दूरवरून कळू शकेल. पेट्रोल आणि CNG साठि निळ्या कलर चे स्टिकर आणि डिझेल गांड्यांसाठी ऑरेंज स्टिकर लावणे अनिवार्य आहे.