kidney stoneshealth tips- किडनी स्टोनमुळे (kidney stones) वेदना असह्य होतात. जेव्हा मीठ आणि शरीरातील इतर खनिजे एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो. त्याचा आकार कधीही निश्चित नसतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या वेबसाईडवर याबाबत माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या म्हण्यानुसार, आपण जे काही खातो पितो यावर स्टोनची स्थिती अवलंबून असते. आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची माहिती सांगणार आहोत.

कोल्ड-ड्रिंक्स पासून दूर राहाः स्टोनचा (kidney stones) त्रास असलेल्या व्यक्तींना डॉक्टर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण कोल्ड-ड्रिंक्सचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. त्यात केमिकल्स आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे स्टोनचा त्रास वाढू शकतो.

व्हिटामीन सी-ः रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लोक आता व्हिटॅमिन सी किंवा लिंबूवर्गीय फळांकडे अधिकाधिक आकर्षित होऊ लागले आहेत. कदाचित आपण विसरत आहात की जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी देखील स्टोनची समस्या निर्माण करू शकते. तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल्सयुक्त फळांच्या रसाचे सेवन नुकसानकराक ठरू शकते.(health tips)

----------------------------------------

Must Read

1) BREAKING: UK च्या फ्लाइट्सबद्दल भारताचा मोठा निर्णय!

2) मोठी बातमी, संजय राऊत यांच्या पत्नीबद्दल ईडीने केला नवीन खुलासा

3) 'हा सरपंचपदाचा नसून लोकशाहीचा लिलाव', अण्णा हजारे संतापले

4) Whatsapp वर कुणी ब्लॉक केलंय? या साध्या ट्रिक्सनी काढा शोधून!

5) नवीन वर्षात ठाकरे सरकारचा कैद्यांना दिलासा

----------------------------------------

ऑक्सलेट असलेल्या वस्तू कमी खाः स्टोनच्या बाबतीत डॉक्टर प्रथम ऑक्सलेट न खाण्याचा सल्ला देतात. पालक, काही धान्य, क्रॅनबेरी, रताळे आणि चॉकलेट इत्यादींमध्ये ऑक्सलेट जास्त प्रमाणात आढळते. काही लोक टोमॅटो खाणे टाळा. पण टोमॅटोमध्ये फारच कमी प्रमाणात ऑक्सलेट आढळते.

जास्त सोडियमः जर तुमच्या अन्नात भरपूर सोडियम असेल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. जंक फूड, पॅक फूड आणि जास्त प्रमाणात मीठ खाणे टाळावे. बाहेरचे चिप्स, सूप, स्नॅक्स यांमध्ये जास्त प्रमाणात मीठाचा वापर केला जातो. म्हणून पॅकबंद पदार्थ खाऊ नका.

अ‍ॅनिमल प्रोटीनः प्राण्यांमधील प्रोटीन्स शरीरात कॅल्शियम ऑक्सलेट, कॅल्शियम फॉस्फेट आणि यूरिक एसिड स्टोनचा धोका वाढवते. म्हणून, आपण आपल्या अन्नामध्ये प्राण्यांकडून मिळणारे प्रथिने कमी ठेवले पाहिजे. मांस, मासे ऐवजी दूध आणि चीजऐवजी शेंगदाणे, मसूर किंवा सोयाबीन पदार्थांपासून प्रोटिन्स मिळवणे हा एक चांगला पर्याय मानला जातो.

डीटॉक्सिफिकेशन आवश्यकः मूत्रपिंडाला नैसर्गिक मार्गाने डिटॉक्स करण्यासाठी भरपूर पाणी प्या. याशिवाय स्टोनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आवळा, डाळिंब आणि सफरचंदांचे व्हिनेगर यासारख्या गोष्टी फायदेशीर ठरतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट प्लॅन घेऊन खाण्या पिण्यात पोषक पदार्थांचा समावेश करा.