modi feed to bird


देशातील केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात या सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव झाला आहे. ही साथ महाराष्ट्रासह आणखी राज्यांत पसरू नये, यासाठी अतिशय दक्षता घेण्यात येत आहे. आणखी कोणत्या राज्यांत बर्ड फ्लूची (bird flue) साथ पसरण्याचा धोका आहे, याचा अंदाज घेऊन केंद्रीय पशुसंवर्धन खात्याने विविध ठिकाणी पाहणी सुरू केली आहे. 

दिल्लीमध्ये कोंबड्या किंवा अन्य पाळीव पक्षी आणण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तसेच देशभर कोरोनाच्या साथीने थैमान घातलेले असतानाच आता त्यात बर्ड फ्लूची भर पडल्याने केंद्र तसेच राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

----------------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीच्या दौरावर दोन गवे

2) पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

3) मनसेचे बाळा नांदगावकर 'ठाकरे सरकार'वर संतापले

----------------------------------------------

बर्ड फ्लूवरुन राजकारण (politics) सुरू आहे. समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्विट करुन बर्ड फ्लूवरुन जोरदार निशाणा साधला आहे. आय. पी. सिंह यांनी मोदी मोराला दाणे खायला घालत असतानाचा फोटो ट्विट केला आहे. तसेच "या माणसाचं काय करावं?, पक्ष्यांना दाणे खायला घातले आणि पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले" असं कॅप्शन दिलं आहे. 

काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनावरून भाजपाचे राजस्थानमधील आमदार मदन दिलावर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. देशात बर्ड फ्लूचा फैलाव होण्यामागे शेतकरी आंदोलनाचा मोठा हात आहे, असे विधान मदन दिलावर यांनी केलं आहे.

दिलावर म्हणाले की, शेतकरी (farmers) आंदोलनामध्ये सहभागी झालेले शेतकरी दररोज चिकन, बिर्याणीसह अन्य लज्जतदार पदार्थांवर ताव मारत आहेत. पार्ट्या करत आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूच्या फैलावाचा धोका सातत्याने वाढत आहे. देशात बर्ड फ्लू पसरवण्यामध्ये शेतकरी आंदोलनाचा मोठा हात आहे. 

दरम्यान, दिलावर यांनी शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांमध्ये दहशतवादीही लपून बसल्याचीही शंका व्यक्त केली. तसेच मोठ्या संख्येने रस्ता अडवून बसलेल्या आंदोलकांना आता सरकारने रस्त्यावरून उठवले पाहिजे अन्यथा बर्ड फ्लूसारखे घातक आजार फैलावून हे शेतकऱ्यांचे तथाकथित आंदोलन देशामध्ये मोठे संकट निर्माण करेल.देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू (bird flue) साथीचा फैलाव झाला आहे. कुठेही पक्षी मरण पावल्याची घटना नजरेस आली तर महाराष्ट्रासह विविध राज्यांतील पशुसंवर्धन खात्यांकडून त्याची तातडीने दखल घेतली जात आहे. घटनास्थळी जाऊन सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जात आहेत. उत्तर प्रदेशमधील संग्रामपूर येथेही सहा कावळे मरण पावल्याचे निदर्शनास आले. कानपूरचे प्राणी संग्रहालयही काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. मध्य प्रदेशमधील 13 जिल्ह्यांमध्ये फैलाव झाला आहे. पंजाबमध्ये अन्य राज्यांतून कोंबड्यांची आयात करण्यास 15 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.