molestationcrime news-
भोकर तालुक्यात संपूर्ण राज्याला हादरा देणारी घटना उघडकीस आली आहे. सालगडी म्हणून शेतमालकाकडे काम करणर्‍यानेच शेतमालकाच्या ५ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार (rape case) करुन तिचा खुन (murder) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या सालगड्याचा शोध घेऊन अटक केली आहे. बाबु संगेराव असे या सालगड्याचे नाव आहे.

भोकर तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला आहे. शेतमालकाने बाबु संगेराव याला सालगडी म्हणून ठेवले होते. त्यामुळे त्याचे शेतमालकाच्या घरी जाणे येणे होते. त्यांच्या ५ वर्षाच्या मुलीचा घराबाहेर मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदनात तिचा खुन (murder) करण्यापूर्वी तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. (crime news)

त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या घटनेनंतर त्यांचा सालगडी दिसत नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन बाबु संगेराव याला अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

--------------------------------
Must Read

1) ठाकरे सरकारने आता घेतले 'हे' तीन महत्त्वाचे निर्णय

2) आठ जिल्ह्यात 5 ते 25 मार्चदरम्यान सैन्यभरती

3) ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे म्हणाले…

--------------------------------