salman khan


छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ (#bigboss14) बॉलिवूडचा भाईजान सलामान खान (salman khan) सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १४ वे पर्व सध्या चर्चेत आहे. प्रत्येक आठवड्याला या शोमधून कोणता तरी स्पर्धेक हा घरी जात असतो. या शोच्या आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कारण सलमान खान पहिल्यांदा कोणता तरी स्पर्धक घरी जाताना पाहून रडला आहे.

नुकताच कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (instagram account) आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या भागात रूबीना दिलैक-अभिनव शुक्ला, जास्मिन भसीन-अली गोनी हे गार्डन एरियात असल्याचे दिसते. हे चौघे एकमेकांना निरोप देत रडत असल्याचे दिसते. 

--------------------------------------------------------------

Must Read 

1) विद्यापीठातील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

2) राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

3) भारताने केलेल्या Air Strike मध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू

4) एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली

5) Marathi Joke : महापावसाळी आघाडी

------------------------------------------------------------

अभिनव आणि जास्मिनला सलमान पुढे यायला सांगतो. ते दोघ रेड बॉक्समध्ये असतात. सलमान त्यांची माफी मागतो आणि पहिल्यांदा सलमान (salman khan) कॅमेरासमोर रडतो. तर बाकी सगळे स्पर्धेक (#bigboss14) हे घरात असतात. या दोघांपैकी एकाला घरी जातान पाहून विकास गुप्ता, राहूल वैद्य आणि राखी सावंत यांनाही रडू येते.

या सोबत आणखी एक व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला आहे. या व्हिडीओत सलमान बिग बॉसच्या घरात जाऊन साफसफाई करताना दिसत असल्याचे पाहायला मिळते. मात्र त्याने कोणतेही काम छोटे नाही असे म्हटले आहे. सध्या भाईजानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी कमेंट करत सलमानचे कौतुक केले आहे. बिग बॉसच्या १३ व्या पर्वातही सलमानने बिग बॉसच्या घरात भांडी धुतली होती.