(Paytm) सध्या सगळीकडं फास्टॅगची (Fastag) चर्चा आहे. सरकारनं महामार्गांवर प्रवास करणाऱ्या सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य केलं असून, ज्या वाहनधारकांनी आपल्या वाहनावर फास्टॅग लावलेले नसतील त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंतची सवलत देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बातम्यांमधून, इंटरनेटवर आणि सोशल मीडियावरही फास्टॅगची चर्चा आहे. हाच विषय ट्रेंडिंग आहे. या क्षेत्रात आपलं स्थान बळकट करण्याची हीच संधी असल्याचं लक्षात घेऊन पेटीएम पेमेंट्स बँकेनं (Paytm Payments Bank) देशभरात 60 लाख फास्टॅगची विक्री केली आहे.

पेमेंट्स बँकेनं देशातील 250 टोल नाक्यांवर (Toll Plaza) कॅशलेस पेमेंटच्या (Cashless Payment ) सुविधेचा लाभ घेण्याची संधी नागरिकांना दिली असल्याचं पेटीएमनं (Paytm) म्हटलं आहे. पेटीएम फास्टॅगचा वापर केल्यास पेटीएम वॉलेटमधून (Paytm Wallet)पैसे देता येत असल्यानं, कॅशलेस टोल पेमेंटसाठी देशातील नागरिक पेटीएम फास्टॅगला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं पेटीएमनं म्हटलं आहे.

काय आहेत फायदे?

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी PayTm युजर्सना वेगळे खातं उघडण्याची किंवा वेगळे वॉलेट डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. तसंच इतर बँकांकडून (Banks)फास्टॅग घेताना, ग्राहकांना ओळखपत्र, फोटो, स्वतःची माहिती द्यावी लागते, वेगळे खाते, लॉगिन क्रेडेन्शियल्स नव्यानं तयार करून ते लक्षात ठेवावं लागतं. बँकांकडून घेतलेले फास्टॅग्ज कार्यान्वित होण्यासाठी दोन तासांचा अवधी लागतो, पेटीएम फास्टॅग मात्र युजरला ते मिळाल्याक्षणी कार्यान्वित केले जातात. पेटीएम अ‍ॅपवर (Paytm App) सर्व फास्टॅग व्यवहार पाहता येतात. काही समस्या आल्यास युजर्स अॅपवरच त्याबाबत तक्रार करू शकतात, त्यांचं निवारणही अगदी अल्प वेळात केलं जातं. यासाठी अखंड (24 बाय 7) काम करणारी एक टीम तैनात करण्यात आल्याचं पेटीएमनं म्हटलं आहे.

15 फेब्रुवारीपासून देशातील सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक असून, (Paytm)राष्ट्रीय महामार्गांवर (National Highway) प्रवास करणाऱ्या वाहनांना कोणताही टोलनाका ओलांडताना फास्टॅग कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टमद्वारे टोल भरावा लागणार आहे. सर्व टोल नाक्यांवर कॉन्टॅक्टलेस आणि इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्याच्या सरकारच्या योजनेचा हा भाग आहे. यामुळे महामार्गावरील टोल नाक्यांवरील व्यवहार अधिक वेगानं होतील. रोख रकमेच्या स्वरूपात टोल देताना रोख पैशांची देव-घेव, सुट्टे पैसे नसल्यानं उद्भवणारे प्रसंग यामुळं टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा हे दृश्य नेहमीचेच झाले होते. आता फास्टॅगमुळं अगदी काही क्षणात टोल भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते त्यामुळं टोल नाक्यावर वाहनांना करावी लागणारी प्रतीक्षा संपणार असून, वेळ आणि इंधन दोन्हींचीही बचत होणार आहे.