maruti suzuki vitara brezza
automobile news- मारुती सुझुकी (maruti suzuki)आपली नेक्स्ट जनरेशन विटारा ब्रेझावर काम करीत आहे. कंपनीने या प्रसिद्द कारचे सेकंड जनरेशन मॉडल २०२२ च्या पहिल्या तिमाहीत लाँच करणार आहे, अशी माहिती देण्यात येत होती. परंतु, आता विटारा ब्रेझा (maruti suzuki vitara brezza)२०२१ च्या पहिल्या तिमाहीत येवू शकते.

कंपनी तिसऱ्या तिमाहीत ही कार लाँच करणार आहे. म्हणजेच दिवाळी आधी ही कार बाजारात एन्ट्री करणार आहे. मारुतीची ही कार खूप आधीपासून आपल्या सेगमेंटमध्ये नंबर वन कार राहिली आहे. यामुळे दिवाळी आधी कारला लाँच केल्यास कंपनीला त्याचा मोठा फायदा मिळू शकतो. कंपनीने या कारला फेब्रुवारीत अपडेट केले होते.

--------------------------------------

Must Read

1) कृषी कायद्यांना स्थगिती; शरद पवार म्हणतात की...

2) चिंताजनक! राज्यात पुन्हा वाढू लागते कोरोना बळी

3) १६ जानेवारीपासून होणार लसीकरण

--------------------------------------

नवीन मारुती ब्रेझा (maruti suzuki vitara brezza) मध्ये १.५ लीटर K15B पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 103 bhp चे पॉवर आणि 138 Nm टॉर्क जनरेट करते. यासोबतच ५ स्पीड मॅन्यूअल आणि ४ स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स सोबत ऑप्शन आहे. ऑटोमॅटिक गियरबॉक्सच्या व्हेरियंटमध्ये मारुतीची स्मार्ट हायब्रिड टेक्नोलॉजी दिली आहे. मॅन्यूअल गियरबॉक्स मध्ये ब्रेझाचे मायलेज १७.०३ किलोमीटर, तर स्मार्ट हायब्रेड टेक्नोलॉजी सोबत येणाऱ्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरियंटचे मायलेज १८.७६ किलोमीटर प्रति लीटर आहे.

ब्रेझाच्या फेसलिफ्ट मॉडलमध्ये रिवाइज्ड अपहोल्स्ट्री, लेदर फिनिश स्टीयरिंग व्हील सह नवीन ७ इंचाचा स्मार्ट प्ले स्टूडियो इन्फोटेनमेंट सिस्टम दिले आहे. या इन्फोटेनेमेंट सिस्टममध्ये आता लाइव्ह ट्रॅफिक अपडेट, व्हाइस रिकग्निश, व्हीकल अलर्ट, आणि क्यूरेटेड ऑनलाइन कॉन्टेंट सारखी सुविधा दिली आहे. तसेच आधी प्रमाणे इन्फोटेनमेंट सिस्टम अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कार प्ले चा सपोर्ट दिला आहे.