effect of tea on healthhealth tips- चहाचे घोट घेणे अनेकांना पसंत असते. अनेक लोकांची दिवसाची सुरूवात चहाशिवाय अर्धवट असते. एक दिवस चहा (effect of tea on health) न प्यायल्यास डोके दुखू लागते. योग्य प्रमाणात चहा प्यायल्याने कसलेही नुकसान तर होत नाही, पण रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीराला कोणत्या समस्या होतात ते जाणून घेवूयात…

1. लठ्ठपणा

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने यात विरघळलेली साखर सुद्धा शरीरात जाते, ज्यामुळे वजन वाढू लागते आणि लठ्ठपणाची समस्या होते.

2. सांधेदुखी

चहाच्या सेवनाने हाडांमध्ये वेदना होऊ लागतात आणि दातांमध्ये सुद्धा पिवळेपणा येतो.

3. तणाव

चहामध्ये (effect of tea on health) मोठ्या प्रमाणात कॅफिन असते, जे मेंदूला उत्तेजित करण्याचे काम करते. रिकाम्या पोटी किंवा जास्त जहा प्यायल्याने तणाव आणि औदासिन्य सारखी समस्या होते.

4. अल्सर

अनेक लोक जास्त स्ट्राँग चहा पितात. परंतु सकाळी असा चहा प्यायल्याने पोटाच्या आतील भागात जखमा होतात, ज्या हळुहळु पोटात अल्सरची समस्या निर्माण करतात.

5. पचनशक्ती

सकाळच्या वेळी नेहमी लोक रिकाम्या पोटी चहा पितात. त्यासोबत काही खात नाहीत, ज्यामुळे पोटात गॅसची समस्या होते आणि पचनशक्ती खराब होते. (health tips)

6. थकवा

सामान्यपणे म्हटले जाते की, चहा प्यायल्याने सुस्ती येते. परंतु सकाळी दुधाचा चहा प्यायल्याने दिवसभर थकवा कायम राहतो आणि स्वभावात चिडचिडेपणा राहतो.

7. ह्रदय

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने हृदयाची धडधड वाढते, ज्यामुळे हृदयाचे आजार होण्याची शक्यता असते.