dr arvind naiklocal news- रुग्णाची नाडी पकडताच रोगाचे निदान (Diagnosis of the disease) करणारे हेरले (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध डॉ. अरविंद लक्ष्मण नाईक (वय 84) यांचे निधन झाले.  त्यांच्या निधनामुळे हेरले पंचक्रोशीतील वैद्यकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

अल्पमोबदला,अचूक निदान, योग्य सल्ला यामुळे त्यांनी हजारो रुग्णांचा विश्वास मिळवला होता. डॉ. नाईक यांची उपचार पद्धती प्रभावी होती. रुग्णांमध्ये आजारावर मात करण्याचा जागवलेला आत्मविश्वास हेच त्यांच्या प्रभावी उपचार पद्धतीचे गमक होते. ज्या वेळी रुग्ण त्यांच्या दवाखान्यात जायचा तेव्हा त्यांच्या पाठीवर थाप पडली की औषध विनाच रुग्णांचा 50 टक्के आजार बरा होत असे. (local news)

--------------------------------

Must Read

📺 फक्त ११३० रुपयात घरी घेऊन जा ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही

📲 सर्व मेसेजिंग Apps आता इथे एकाच ठिकाणी मिळणार

🏏 बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिके

--------------------------------

काही रुग्णांना मोठ्या दवाखान्यात गंभीर आजारासाठी शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांघितले जायचे, त्या रुग्णांना डॉ. नाईक यांच्या दवाखान्यात केवळ गोळीवरच बरे (Diagnosis of the disease) वाटायचे. त्यांच्या 40 वर्षाच्या अखंड आरोग्यसेवेत एखादया रुग्णाला सलाईन लावल्याची वेळ क्वचितच आली असावी. वेळेला महत्व देणारे, शिस्तप्रिय आणि परखडपणे बोलणारे डॉ. नाईक यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य अविस्मरणीय असेच म्हणावे लागेल.