dont-download-these-seven-apps-bank-account-may

(App) आजच्या या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात हॅकिंग (Hacking) आणि ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एटीएम कार्ड क्लोन करून फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हॅकर्स (Hackers) मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढून घेऊन त्यांची लूट करत असतात. याच पद्धतीने कस्टमर केअरच्या नावाखाली देखील मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. यामध्ये ग्राहकांनी या कस्टमर केअर (Customer Care) नंबरवर फोन लावल्यास ग्राहकाच्या खात्यातून पैसे आपोपाप गायब होतात.

अनेकदा आपण कस्टमर केअरसाठी गुगलवर नंबर सर्च करतो. यामध्ये मिळालेला नंबर कधीकधी खोटा आणि फसवा असतो. हे नंबर फसवणूक करणारी टोळी चालवत असते. ग्राहकांनी या कस्टमर केअर नंबरवर फोन लावल्यास ग्राहकाच्या खात्यातून पैसे आपोपाप गायब होतात. त्यामुळे यापासून सावधान राहण्याची गरज आहे. याचबरोबर हे फसवणूक करणारे ग्राहकांना त्यांच्या मोबाईलमध्ये रिमोट डेस्कटॉप अ‍ॅप (Remote Desktop App) डाऊनलोड करण्यास भाग पाडतात. 

यामधून ग्राहकांची सर्व माहिती घेउन ते त्यांची फसवणूक अर्थात लूट करतात. यामुळे या अॅपपासून देखील सावध राहण्याची गरज आहे. हे अ‍ॅप कोणत्या पद्धतीने काम करतात यांची कोणतीही माहितीने उपलब्ध नाही. खरेतर हे अ‍ॅप अतिशय फायदेशीर असून याच्या मदतीने अनेक (App)  कामे होऊ शकतात. परंतु हे फसवणूक करणारे याचा उपयोग चुकीच्या कामांसाठी करत असल्याने यावरील विश्वास कमी होऊ लागला आहे.

फसवणूक करणारी ही टोळी ग्राहकांना एक लिंक पाठवते. या लिंकवर क्लिक करण्यासाठी ते आपल्याला एक रिमोट डेस्कटॉप अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगतात. त्यानंतर तुम्ही ही लिंक ओपन केल्यास त्यांना थेट तुमच्या मोबाईलचा स्क्रीन दिसू लागतो. यामध्ये तुम्ही करत असलेली प्रक्रिया पाहून ते तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी देखील पाहू शकतात. त्यानंतर याच ओटीपीच्या मदतीने तुमच्या बँकेतील रक्कम काढून तुमची लूट केली जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कस्टमर केअर नंबर लावण्याआधी तो योग्य आहे कि नाही याची खात्री करून घ्या. यामुळे तुमची फसवणूक होण्यापासून तुम्ही वाचू शकता.

हे अ‍ॅप डाऊनलोड करू नका

1) TeamViewer QuickSupport

2)Microsoft Remote desktop

3)AnyDesk Remote Control

4)AirDroid: Remote access and File

5)AirMirror: Remote support and Remote control devices

6)Chrome Remote Desktop

7)Splashtop Personal- Remote Desktop